पुरूषोत्तम जाधवांची नरेंद्र पाटीलांना साथ

धाकट्या भावाला खासदार करण्याचा दिला शब्द
सातारा – शिवसेनेच्या उमेदवारीसाठी शर्यतीत असलेले पुरूषोत्तम जाधव यांनी नरेंद्र पाटील यांना साथ देण्याचा शब्द दिला. लोकसभा निवडणुकीत जाधव की पाटील हा प्रश्‍न महत्वाचा नसून शिवसेनाचा खासदार निवडून येणे महत्वाचे आहे. त्यामुळे धाकट्या भावाला खासदार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

साताऱ्यात भाजप व सेना पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाधव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, सन. 2009 पासून निवडणुकीच्या माध्यमातून जिल्ह्यात शिवसेनेचा धनुष्यबाण पोहचविण्याचे काम केले. मी आता पुन्हा शिवबंधनात आहे. त्यामुळे वेगळा विचार करण्याचा प्रश्‍नच शिल्लक राहत नाही. 1996 च्या निवडणुकीची पुनरावृत्ती करण्याची वेळ आली आहे. अशावेळी जाधव आणि पाटील हा प्रश्‍न महत्वाचा नाही. परंतु ज्यांना मागील 10 वर्षापासून निवडून दिले. त्यांनी इतक्‍या वर्षात काय केले, हा प्रश्‍न विचारण्याची गरज आहे.

आज येथील उद्योगांना सरंक्षण देण्याची परिस्थिती कोणामुळे झाली, हे देखील विचारले गेले पाहिजे. त्याचबरोबर या निवडणुकीत युतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे तरच जिल्ह्यात परिवर्तन होईल. नरेंद्र पाटील यांना वडिलांचा मोठा वारसा आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत सातारा आणि दिल्लीतही भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास जाधव यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)