“पुरंदर’चा प्रस्ताव पर्यावरण विभागाला सादर करणार

पुणे – पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाची मंजुरी मिळविण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून (एमएडीसी) प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. त्यासाठी प्रस्तावित क्षेत्राचा सर्व्हे करण्यात येत आहे. तो लवकरच पर्यावरण विभागाला सादर करण्यात येणार आहे.

राज्य शासनाने नुकताच पुरंदर विमानतळासाठी “एमएडीसी’ला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला आहे. पुरंदर तालुक्‍यातील वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांमधील 2 हजार 832 हेक्‍टर क्षेत्र आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी अधिसूचित करण्यात आले आहे. त्यामुळे विमानतळाच्या मार्गातील मोठा टप्पा ओलांडण्यात आला आहे. मात्र, आता पर्यावरण विभागाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. प्रस्तावित विमानतळासाठीची जागा अधिसूचित करण्यात आली नव्हती. त्यामुळे आतापर्यंत पर्यावरणीय मंजुरीचा प्रस्ताव तयार करण्यात आला नव्हता. मात्र, काही दिवसांपूर्वीच जागा अधिसूचित करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. त्यासाठी या जागेचा पर्यावरणीयदृष्ट्या सर्व्हे करण्यात येत आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती “एमएडीसी’तील अधिकाऱ्यांनी दिली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)