पंजाब नॅशनल बॅंकेत नवा घोटाळा

पाच कंपन्यांनी केली 868 कोटींची फसवणूक

नवी दिल्ली  -पंजाब नॅशनल बॅंकेच्या लंडन येथील शाखेला तब्बल 37 दशलक्ष डॉलर म्हणजे 268 कोटी रुपयांना फसविण्यात आले आहे. हा घोटाळा करणाऱ्यांमध्ये 5 भारतीय कंपन्या सामील आहेत. कंपन्यांनी करारपत्रातील अटींचा भंग केल्याचा आरोपही पीएनबीने केला आहे.

-Ads-

पीएनबीची सहाय्यक बॅंक असलेल्या पीएनबी इंटरनॅशनलच्या इंग्लंडमध्ये सात शाखा आहेत. या शाखांमधून आरोपी कंपन्यांनी खोट्या कागदपत्रांच्या सहाय्याने कर्ज घेतल्याचा आरोप बॅंकेने केला आहे. यात पाच भारतीय कंपान्यांसह 1 अमेरिकन आणि 3 अन्य कंपन्यांचाही समावेश आहे.

एसईपीएल, पेस्को बीम यूएसए, थ्राईश विंड आणि थ्राईश रिसोर्सेस अशी या चार कंपन्यांची नावे आहेत. त्याचप्रमाणे यातील एसईपीएल या कंपनीवर बॅंक ऑफ बडोदाचंही कर्ज असल्याचं पीएनबीने आपल्या आरोपात स्पष्ट केलं आहे. हे कर्ज 2011 ते 2014 या दरम्यान या कंपन्यांनी मिळविले आहे. याप्रकरणी पीएनबी इंटरनॅशनलने युके कोर्टात धाव घेतली आहे.

बॅंकेने दाखल केलेल्या आरोपपत्रात चार नोंदणीकृत कंपन्यांना बॅंकेने डॉलरच्या रूपात कर्ज दिलं होतं. या चारही कंपन्या ऊर्जा क्षेत्राशी संबंधित आहेत. 14 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून नीरव मोदी आणि त्याचे साथीदार देशाबाहेर पसार झाले असतानाच आता पुन्हा एकदा पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) दुसऱ्या घोटाळ्याच्या कचट्यात
सापडली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)