पंजाब, हरियाणातील निवडणूक तयारीचा आढावा

नवी दिल्ली – मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आगामी लोकसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमधल्या निवडणूक तयारीचा आढावा घेतला. पंजाब, हरियाणा आणि चंदीगडच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसमवेत, मुख्य निवडणूक आयुक्तांनी बैठक घेऊन मतदान केंद्रांवर निश्चित किमान सुविधा तरतूद, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात मनुष्यबळ आणि संरचना दृढ करणे, इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र/व्हीव्हीपॅट आणि इतर निवडणूक साहित्याची उपलब्धता यासारख्या मुद्यांवर चर्चा केली.

निवडणूक शांततेत, निष्पक्ष आणि सुरळीत व्हावी यादृष्टीने पंजाब आणि हरियाणाचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, गृह सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सर्वसमावेशक चर्चा झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चंदीगडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही निवडणूकविषयक चर्चा झाली. लोकसभेच्या आगामी निवडणुका जास्तीत जास्त मतदारस्नेही ठराव्यात तसेच दिव्यांगांना आणि ज्येष्ठ नागरिकांना आवश्‍यक त्या सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात असे निर्देश मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)