थायलंडमधील मालिकेसाठी  पुण्याचा संजय टकले सज्ज 

पुणे – जागतिक रॅली मालिकेतील सहभागाचे एक स्वप्न साकार केल्यानंतर पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले आणखी एक महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी सक्रिय झाला आहे. डकार रॅलीतील सहभागाचेही संजयचे स्वप्न असून त्यासाठी तो थायलंडमधील राष्ट्रीय मालिकेच्या दुसऱ्या फेरीत भाग घेईल. येत्या शनिवारी-रविवारी ही फेरी होत आहे.

संजयने अलिकडेच फिनलंडमधील जागतिक रॅली मालिकेतील डब्ल्यूआरसी 3 गटात भाग घेतला. त्यावेळी संजयने फोर्ड फिएस्टा आर 2 कार चालविली. आता तो इसुझु डीमॅक्‍स युटिलिटी कार चालवेल. तो फोर बाय फोर ओपन क्‍लासमध्ये भाग घेईल. थायलंडचा मिनील थान्याफात त्याचा नॅव्हिगेटर असेल.

-Ads-

कंबोडियालगतच्या नाखोन रत्चासीमा प्रांतातील पहिल्या फेरीत संजयने एकूण क्रमवारीत दुसरे स्थान मिळविले होते. त्यावेळी योग्य प्रकारचे टायर नसूनही संजयने कार नियंत्रित ठेवली होती. संजयने सांगितले की, यावेळची रॅली सुनापबुरी प्रांतातील साहा फार्म्स परिसरात होईल. ही मालिका आपल्यासाठी महत्त्वाची असल्याचे सांगून संजय पुढे म्हणाला की, जगप्रसिद्ध डकार रॅलीत भाग घेण्याचे माझे स्वप्न आहे. ही जगातील सर्वाधिक खडतर रॅली मानली जाते. त्यासाठी मला फोर बाय फोर कारचा अनुभव घ्यावा लागेल. थायलंडमधील या मालिकेचा दर्जा फार उच्च आहे. येथील अनेक स्थानिक ड्रायव्हर या मार्गांवर नेहमी सराव करीत असतात. डेलो स्पोर्टस संघाशी आता माझा चांगला समन्वय निर्माण झाला आहे. त्यामुळे मला बऱ्याच आशा आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)