‘मिशन शक्ती’मध्ये पुण्याचे योगदान

पुणे – अंतराळातील 300 किमी लांब असलेल्या उपग्रहाला नष्ट करत “मिशन शक्ती’ ही चाचणी यशस्वीपणे पार पाडण्यात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) संस्थेची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. महत्त्वाचे म्हणजे, या “मिशन शक्ती’मध्ये सहभागी झालेले “डीआरडीओ’चे बहुसंख्य शास्त्रज्ज्ञ हे पुण्यातील डीफेन्स इन्स्टिट्युट ऑफ ऍडव्हान्स टेक्‍नॉलॉजी(डाएट) या संस्थेतून शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी आहेत, अशी माहिती “डाएट’तर्फे देण्यात आली आहे.

“डीआरडीओ’ संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून रूजू होण्यापूर्वी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना “डाएट’मधील प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्‍यक असते. त्यामुळे दरवर्षी देशभरातून निवडण्यात आलेले शास्त्रज्ज्ञ पुण्यातील संस्थेत प्रशिक्षणासाठी येतात. “मिशन शक्ती’ या उपग्रहविरोधी मोहिमेत सहभागी झालेले बहुतांश शास्त्रज्ञ हे “डाएट’मधून उत्तीर्ण झालेले शास्त्रज्ञ आहेत.

“मिशन शक्ती ही “डीआरडीओ’ आणि देशातील संपूर्ण शास्त्रज्ञांसाठी एक मोठे यश आहे. “डीआरडीओ’च्या या यशाबद्दल आम्हाला अतिशय आनंद होत आहे. तसेच, या मोहिमेत सहभागी शास्त्रज्ञ आणि तांत्रिक सहकारी यांचेदेखील संस्थेकडून कौतुक करण्यात येत आहे. भावी शास्त्रज्ञांसाठी ही मोहिम एक मार्गदर्शक मोहिम ठरेल.’

– डॉ. सी.पी. रामनारायणन, उप-कुलगुरू, डाएट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)