प्रो कबड्डी लीग 2018 : पुणेरी पलटनचा हरियाणा स्टीलर्सवर दमदार विजय

नवी दिल्ली – प्रो कबड्डी लीगमधील पुणेरी पलटन आणि हरियाणा स्टीलर्स यांच्यातील  लढतीत यजमान पुणेरी पलटन संघाने हरियाणा स्टीलर्सचा पराभव केला. रोमांचक अशा झालेल्या लढतीत पुण्याने हरियाणाचा 35-33 असा पराभव करत विजय संपादित केला.

सामन्याच्या सुरूवातीस दोन्ही संघामध्ये चुरशीचा मुकाबला झाला. एकावेळी हरियाणाने पुणेरी पलटनवर आघाडी घेतली होती, मात्र दुसऱ्या सत्रात पुणेरी पलटन संघाने चांगली कामगिरी करत हरियाणाच्या हातून 35-33 ने सामना हिसकावून घेत शानदार विजय प्राप्त केला.

-Ads-

पुणेरी पलटनकडून संदीप नरवालने 7 गुण तर जी.बी मोरेने 6 गुण मिळवित संघाच्या विजयात महत्वाची कामगिरी पार पाडली. तर हरियाणाकडून मोनू गोयतने सर्वाधिक 10 गुण प्राप्त केले पण तो आपल्या संघास विजय मिळवून देण्यास अपयशी ठरला. पुणेरी पलटनचा आपल्या घरच्या मैदानावरील हा तिसरा विजय ठरला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)