अक्षय तृतीयेनिमित्त सराफा पेढ्यांवर खरेदीसाठी गर्दी
पुणे – आधुनिक काळात समाजात अनेक बदल झाले आहेत. तरीही सूवर्ण अलंकाराची क्रेझ तसुभरही कमी झालेली नाही. सोन्याला अनेक पर्याय निर्माण झाले आहेत. तरीही “गोल्ड इज गोल्ड’ म्हणत वर्षातील अक्षय तृतीयेच्या (मंगळवारी) मुहुर्तावर पुणेकरांनी सूवर्ण खरेदीचा आनंद लुटला.
साडेतीन मुहुर्तांपैकी संपूर्ण एक मुहुर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केल्यास त्यामध्ये वाढ होत जाते, अशी धारणा आहे. त्यामुळे या दिवशी सूवर्ण खरेदीची परंपरा आहे. या परंपरेनुसार मंगळवारी सकाळपासूनच नागरिकांनी शहरातील विविध सराफांच्या पेढ्यांवर सूवर्ण खरेदीसाठी गर्दी केली होती. मागील वर्षी शुध्द होण्याला (24 कॅरेट) प्रति दहा ग्रॅम 33 हजार 400 रुपये, तर 22 ग्रॅम सोन्याला 31 हजार 400 रुपये भाव होता. यावर्षी दोन्ही प्रकारच्या किंमतीमध्ये केवळ 200 रुपयांनी वाढ झाली आहे. 24 कॅरेटला प्रति ग्रॅमला 33 हजार 600, तर 22 ग्रॅमला 31 हजार 620 रुपये भाव मिळत आहे. अलीकडच्या काळात स्त्रीयांप्रमाणे पुरूषांनाही सूवर्ण अलंकाराचे आकर्षक निर्माण झाले आहे. अंगावर सोने असणे, खुप प्रतिष्ठेचे समजले जावू लागले आहे. त्यामुळे स्त्रीयांबरोबर पुरूषांकडून मोठ्या प्रमाणात सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करण्यात येत आहे. त्याबरोबरच समाजातील काही लोक सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहात आहेत. अशा लोकांकडून सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात सूवर्ण खरेदी करण्यात आली.
यावर्षी विशेषत: पारंपरिक दागिन्यांना मागणी आहे. मोहनमाळ, पाटल्या, बागड्या आणि महाराष्ट्रातील फॅन्सी दागिन्यांना मागणी आहे. काही लोक वेढणी खरेदी करण्यास पसंती देत आहेत. अक्षय तृतीयेला खरेदी करण्याच्या हेतूने काही नागरिकांनी आगाऊ ऑर्डरही दिल्या होत्या.
– शैलेश रांका, “रांका’ ज्वेलर्स