पुणे – 4 हजार 385 मजुरांच्या हाताला काम

शेतात काम नसल्यामुळे शेतमजूरांचा रोजगार हमी कामांकडे कल

पुणे – पाऊस कमी झाल्याने राज्यात यंदा दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे शेतात काम नसल्याने शेतमजूरांसाठी रोजगार हमीची कामे सुरू झाली आहेत. पुणे जिल्ह्यात तब्बल 4 हजार 385 मजुरांना कामे देण्यात आली आहेत. सर्वांधिक मजुरांची संख्या ही इंदापूर तालुक्‍यात 1,505 इतकी आहे; तर सर्वांत कमी म्हणजे 13 मजूर हे वेल्हा तालुक्‍यात कामाला आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ही कामे सुरू आहेत. जिल्ह्यात 4 हजार 385 मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. दुष्काळी परिस्थितीच्या काळात शेतात काही काम नसल्याने राज्य शासनाच्यावतीने अशा प्रकारची रोजगार हमी योजनेची कामे सुरू केली जातात. जेणे करून मजुरांना थोडे फार का होईना उत्पन्न मिळू शकेल. सध्या राज्यातील विदर्भ, मराठवाड्यात ही कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी रोजगार हमीची कामे सुरू आहेत. पुणे जिल्ह्यात यंदा सात तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामुळे या तालुक्‍यांतील शेतकऱ्यांच्या हाताला काम नाही. अशा शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. मागेल त्याला काम या तत्त्वावर ही कामे उपलब्ध केली जात आहेत. ही कामे दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात येत असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मनरेगाच्या शासनाकडून आढावा
मनरेगा योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा शासनाकडून सातत्याने घेतला जात आहे. जिल्ह्यात आगामी काळात मजुरांची संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या योजनेमार्फत शेतमजुरांना शंभर दिवसांचा रोजगार उपलब्ध केला जातो, पण दुष्काळामुळे केंद्र शासनाने मजुरीमध्ये आणखी पन्नास दिवसांची वाढ केली आहे.

राज्यात 44 हजार 555 कामे सुरू
राज्यात मनरेगाची 44 हजार 555 कामे सुरू असून, त्यावर 2 लाख 96 हजार मजूर काम करीत आहेत. 31 जानेवारी अखेरपर्यंत राज्यात 44 हजार 619 मजुरांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर योजना, फळबाग लागवड, अमृतकुंड, शेततळे, अंकुर रोपवाटिका, निर्मल शौचालये, निर्मल शोषखड्डे, कल्पवृक्षफळबाग लागवड, भूसंजीवनी नापेड कंपोस्टिंग आदी कामे केली जात आहेत. सोमवारपर्यंत जिल्ह्यात 4 हजार 385 मजूर कामावर असून, इंदापूर तालुक्‍यात सर्वांधिक 1505 मजूर कामावर आहेत. त्यापाठोपाठ बारामती 710, शिरुर 444, खेड 384, आंबेगाव 376, दौंड 333, जुन्नर 174, भोर 137, हवेली 133, मावळ 45, मुळशी 24, वेल्हा तालुक्‍यात केवळ 13 मजूर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)