पुणे – पेपरफुटीने झालेले नुकसान वसूल होणार का?

विधि (लॉ) अभ्यासक्रम परीक्षा : विद्यापीठ कायद्यात तरतूद

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विधि (लॉ) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाची पेपर फुटल्याप्रकरणी जबाबदारी निश्‍चित करून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले. याबाबत विद्यापीठाचे झालेले नुकसान जबाबदारी निश्‍चित केलेल्या दोषी अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याची तरतूद नवीन विद्यापीठ कायद्यात आहे. त्यामुळे पेपरफुटीवरून होणारे नुकसान दोषी अधिकाऱ्यांकडून विद्यापीठ वसूल करणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाची दि. 15 व 16 फेब्रुवारी रोजी झालेली परीक्षा रद्द करण्यात आली. कारण, या विषयाची प्रश्‍नपत्रिका परीक्षेपूर्वीच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर “अपलोड’ करण्यात आली. हा पेपर व्हायरल झाला. परिणामी, विद्यापीठाने या दोन्ही दिवसातील परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

विधि अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी पुन्हा नवीन प्रश्‍नपत्रिका तयार करावी लागेल. त्यासाठी प्रश्‍नपत्रिका तयार करणाऱ्यांसाठी दिले जाणारे मानधन द्यावे लागेल. कागद, स्टेशनरीचे नुकसान झाले आहे. पुन्हा परीक्षेमुळे विद्यापीठाचे खर्च झाला असून, ती सर्व दोषी अधिकाऱ्यांकडून वसूल करणे आता विद्यापीठाला शक्‍य आहे. कारण नवीन विद्यापीठ कायद्यात कलम 138 (1) मध्ये विद्यापीठाची कोणतेही झालेले नुकसान, संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल केली जाण्यास पात्र असेल, अशी तरतूद आहे

दरम्यान, आर्थिक नुकसान झाले असले विद्यार्थ्यांना झालेला मनस्ताप आणि विद्यापीठांच्या प्रतिमेला गेलेला तडा, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर अशा घटना पुन्हा होऊ नये, यासाठी संबंधित दोषी व्यक्‍तींवर कारवाईचा बडगा विद्यापीठाकडून उगारला जाणार आहे, हेच आता पाहावे लागेल.

विधि अभ्यासक्रमाच्या पेपर फुटीप्रकरणी परीक्षा नियंत्रकांकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले. त्याप्रमाणे जबाबदारी निश्‍चित करून, त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्याबाबत येत्या दि. 27 फेब्रुवारी रोजी बैठक होणार आहे. त्यात जबाबदारी निश्‍चित करून पुढील कार्यवाही केली जाईल.
– डॉ. एस. एन. उमराणी, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)