पुणे – स्थायी समिती अध्यक्षपदी कोण?

पुणे – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आणि पालिकेतील समीकरणे लक्षात घेऊनच स्थायी समिती अध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान, ही माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याचे चित्र गुरूवारीच स्पष्ट होणार आहे.

महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी दि. 5 मार्चला निवडणूक होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची मुदत गुरूवारी दुपारी 3 ते 5 अशी आहे. पालिकेत भाजपचे बहुमत आहे. त्यामुळे भाजपकडून ज्या सदस्याला उमेदवारी मिळणार, तोच अध्यक्षपदी विराजमान होणार हे निश्‍चित आहे. या पदासाठी चार सदस्य इच्छुक असून त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मुक्‍काम ठोकला आहे. महापालिकेतील जातीय समिकरणे लक्षात घेता या अध्यक्षपदासाठी मोठी चुरस होणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यावर आता भाजप कशा पद्धतीने मार्ग काढणार आणि अध्यक्षपदी कोणाला संधी देणार, हे गुरूवारी प्रत्यक्ष अर्ज भरतानाच स्पष्ट होऊ शकणार आहे. या प्रक्रियेदरम्यान भाजपने सर्व नगरसेवकांना व्हिप बजावला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)