पुणे – स्थायीच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात?

भाजपचे प्राबल्य : दि.5 मार्च रोजी निवडणूक

पुणे – पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी येत्या 5 मार्च रोजी निवडणूक होणार असून, दि.28 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. महापालिकेमध्ये भाजपची एकहाती सत्ता असून, स्थायी समितीतही प्राबल्य आहे. त्यामुळे भाजपचाच अध्यक्ष होणार असून, यासाठी कोणाची निवड होणार याबाबत उत्सुकता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्थायी समितीमध्ये भाजपचे 10, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे-4 तर कॉंग्रेस अणि शिवसेनेचा प्रत्येकी एक सदस्य आहे. स्थायी समितीतून नुकतेच भाजपचे 6 तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन सदस्य निवृत्त झाले असून, त्या जागांवर नवीन 8 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या वतीने नवीन सदस्य निवड करताना विद्यमान सदस्य आणि ज्येष्ठ नगरसेवक सुनील कांबळे यांना पुन्हा संधी दिली आहे. तसेच मागील दोन वर्षांपासून स्थायी समिती अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे ज्येष्ठ नगरसेवक हेमंत रासने आणि राजेंद्र शिळीमकर यांनाही स्थान दिले आहे. त्यामुळे यावर्षीच्या अध्यक्षपदासाठी कांबळे, रासने आणि शिळीमकर यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने चुरस असल्याचे बोलले जात आहे. हे तिघेही मूळचे भाजपचे असून, कांबळे यांची पाचवी टर्म, रासने यांची तिसरी टर्म तर शिळीमकर यांची दुसरी टर्म आहे. त्यामुळे पक्ष यंदा निवडणुकीच्या वर्षात ज्येष्ठतेचा निकष लावणार, की जातीय समीकरणावर अध्यक्षाची निवड करणार? हे येत्या 28 फेब्रुवारीला स्पष्ट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)