पुणे – मुसळधार पावसामुळे सिंहगड कॉलेजच्या आवारातील सीमाभिंत कोसळून झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी आहेत. याची माहिती घेण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांनी घटनास्थळी भेट दिली असून दुःख व्यक्त केले आहे.
मुक्ता टिळक म्हणात्या की, ही घटना दुर्देवी आहे. याला जबाबदार असलेल्या सर्वांवर कारवाई करण्यात येईल. कोंढवा दुर्घटनेनंतर शहरातील 270 लेबर कॅम्पची तपासणी करण्यात आली असून त्यातील 5 धोकादायक कॅम्प तातडीनं हलविण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
सोमवारी रात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास सिंहगड कॉलेजच्या कॅम्पसमधील इमारतीच्या आवारातील सीमाभिंत ढासळली. यावेळी भिंतीच्या बाजूला असलेल्या 3 ते 4 झोपड्यावर ही भिंत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ टीम घटनास्थळी पोहचली असून बचावकार्य हाती घेण्यात आले आहे.