#PuneWallCollapse : 8 बिल्डरांपैकी दोघांना पुणे पोलिसांकडून अटक

पुणे – पुण्यातील कोंढवा भागात मध्यरात्री दीड ते दोनच्या दरम्यान कोंढवा बुद्रुक येथील सोमजी पेट्रोल पंपजवळ असलेल्या बहुमजली अॅल्कॉन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. पुणे पोलिसांनी बिल्डर पंकज व्होरा आणि जगदीश अग्रवाल यांच्यासह 8 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच विपुल आणि विवेक अगरवाल या बिल्डर बंधूंना ताब्यात घेतले आहे.

पुण्यातील कोंढवा येथे झालेल्या दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

कोंढवा दुर्घटना प्रकरण : बिल्डर्सविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी अल्कॅान सोसायटी उभारणाऱ्या अल्कॅान लँडमार्क्स व कांचन या दोन रजिस्टर्ड संस्थांमधील भागीदार व बांधकाय व्यावसायिकांच्या नावे गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जगदीशप्रसाद तिलकचंद अगरवाल, सचिन जगदीशप्रसाद अगरवाल, राजेश जगदीशप्रसाद अगरवाल, विवेक सुनील अगरवाल, विपुल सुनील अगरवाल, पंकज व्होरा, सुरेश शहा, रश्मिकांत गांधी व त्यांच्या संस्थेमध्ये काम करणारे अभियंता, ठेकेदार यांच्यावर भारतीय दंड विधान ३०४, ३४ कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)