पुणे – व्होटर स्लीप वाटणार तरी कशा? प्रशासनासमोर आव्हान

संग्रहित छायाचित्र

पुणे – पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांना फोटो व्होटर स्लीपचे वाटप करण्यात येत आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत व्होटर स्लीप घरोघरी जाऊन देण्यात येत आहे. अजूनही काही नागरिकांना या स्लीप मिळाल्या नाहीत. सुमारे 4 हजार 500 बीएलओंना सुमारे 41 लाख मतदारांना येत्या तीन दिवसांत व्होटर स्लीप वाटपाचे आव्हान असणार आहे.

मतदानाची प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी, बोगस मतदानाला आळा बसावा, या हेतूने प्रत्येक मतदाराला फोटो व्होटर स्लीप देण्याचे निवडणूक आयोगाने ठरविले आहे. यापूर्वी उमेदवारच मतदारांना स्लीप देत होते. तसेच मतदान कक्षात जाताना त्या स्लीपवर असलेले उमेदवाराचे नाव व निवडणूक चिन्ह असल्याने त्यावर बंदी आहे. ही बाब विचारात घेवून निवडणूक आयोगाने मतदारांना फोटो व्होटर स्लीप देण्याचा उपक्रम मागील लोकसभा निवडणुकीपासून हाती घेतला आहे. व्होटर स्लीप वाटपाची जबाबदारी बीएलओ यांच्यावर सोपविण्यात आली आहे. एकाच वेळी एवढ्या मतदारांपर्यंत या स्लीप पोहचविण्यासाठी शिक्षकांचीही मदत घेण्यात आली आहे.

ग्रामीण भागात व्होटर स्लीप वाटणे सोपे जात असले, तरी शहरी भागात या स्लीप वेळेत मतदारांपर्यंत पोहचविणे हे आव्हान बीएलओ यांच्यासमोर आहे. एका बीएलओ यांना सुमारे 1 ते दीड हजार मतदारांना व्होटर स्लीप द्यावयाच्या आहेत. हे वाटप करताना एकाच भागातील सलग घरक्रमांकानुसार या स्लीप देण्यात आलेल्या नाहीत. एकाच वार्डातील परंतु वेगवेगळ्या घरक्रमांकाची सरमिसळ आहे. त्यामुळे प्रथम एकसारख्या क्रमांकानुसार एका भागातील घरक्रमाकांनुसार या ओळखपत्र लावून घेण्याचे काम पहिल्यांदा करावे लागत असल्याचे बीएलओ यांचे म्हणणे आहे.

अडचणींचा डोंगर
पत्ते शोधावे लागत असल्याने शहरी भागात थोडासा वेळ लागत आहे. त्याचबरोबर अंतिम मतदार यादी आणि पुरवणी मतदार यादीनुसार स्लीप तयार करण्यात आल्याने एकाच घरात दोनवेळा या स्लीप वाटण्यासाठी जावे लागत आहे. घरांचे पत्ते न सापडणे, मतदारांची घरे बंद असणे आदी कारणांमुळे छायाचित्र मतदार ओळखपत्राचे वाटप करताना अधिकाऱ्यांना कसरत करावी लागत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)