पुणे – दिव्यांग मतदारांना स्वयंसेवक करणार मदत

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परिपत्रक

पुणे – लोकसभा निवडणूक अधिक प्रभावीपणे व परिणामकारक होण्यासाठी निवडणूक विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दिव्यांग अर्थात अंध, अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदान कक्षापर्यंत जाण्यासाठी आणि बाहेर नेण्यासाठी महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) स्वयंसेवक आता मदतीसाठी पुढे येणार आहेत.

अधिकधिक मतदान होण्यासाठी निवडणूक आयोगाचे प्रयत्न होत आहेत. लोकसभा निवडणुकसाठी दिव्यांग मतदारांना सुविधा पुरविणे, मतदान केंद्रापर्यंत मदत करण्यासाठी आता प्रत्येक मतदान केंद्रावर स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी महाविद्यलायातील एनसीसी व एनएसएसमधील नोंदणीकृत विद्यार्थ्यांची दिव्यांग मतदारांना सहायक म्हणून नेमणूक करावयाचे आहे. त्यासाठी स्वयंसेवकांची यादी पाठविण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने विद्यापीठ व महाविद्यालयांना केल्या आहेत.

त्या पार्श्‍वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी शुक्रवारी सर्व महाविद्यालयांना परिपत्रक काढले आहे. त्यात या उपक्रमासाठी महाविद्यालयांनी आपल्या एनएसएस स्वयंसेवकांची नावे दि. 5 एप्रिलपर्यंत मेलद्वारे पाठविण्यात यावे, असे नमूद करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)