पुणे – ‘पीएमआरडीए’ आयुक्‍तपदी विक्रम कुमार

जिल्हा परिषद सीईओ सूरज मांढरे नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी

पुणे – राज्य शासनाने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यामध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए)आयुक्तपदी विक्रम कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांची नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती शासनाने केली आहे.

-Ads-

“पीएमआरडीए’चे आयुक्त किरण गित्ते यांची मूळ त्रिपुरा केडरला नियुक्ती झाल्याने मागील महिनाभरापासून हे पद रिक्त होते. हा प्रभारी कारभार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता. अखेर शासनाने “पीएमआरडीए’च्या आयुक्तपदी विक्रम कुमार यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत. येत्या दोन दिवसांत विक्रम कुमार हे पदभार स्वीकारणार आहेत.

दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांच्या बदलीचे आदेश नुकतेच देण्यात आले असून त्यांना नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी बढती देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या या बदलीमुळे मांढरे यांनी तत्काळ जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतला आहे.

नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. यांची बदली झाल्यामुळे रिक्त पदावर मांढरे यांची नियुक्ती करण्यात आली. मांढरे यांनी 6 डिसेंबर 2017 मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार घेतला होता.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)