पुणे – नदीपात्रातील बेवारस वाहने पोलिस हटविणार

पुणे – रस्त्यावर अडथळा ठरलेली जी वाहने पोलिसांनी उचलली आहेत, ती नदीपात्रालगतच्या रस्त्यावर ठेवण्यात आली आहेत. मात्र, ती तेथून मोकळ्या मैदानात हलविण्यात येणार आहेत. काही दिवसांनी त्यांचा लिलावही करण्यात येणार आहे.
रस्त्यात अडथळा ठरणारी आणि अनेक महिने आणि वर्षे रस्त्यावर धूळखात, गंजत पडलेली वाहने पोलिसांच्या मदतीने महापालिकेने उचलण्याला सुरूवात केली आहे.

नदीपात्रातील ही वाहने कोणाच्या मालकीची आहेत त्यांनी ती दंड भरून घेऊन जावीत, असे आवाहन पोलीसांतर्फे करण्यात आले आहे. असे असतानाही बहुतांश जणांनी ती नेलीच नाहीत. महापालिकेतर्फे दंड आकारण्यात आलेल्या वाहनांचा दंड 15 हजार रुपये असून तो जास्त आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे वाहने सोडविणाऱ्यांची संख्या कमी आहे. मात्र, प्रत्यक्षात यातील अनेक वाहने या चोरीचीही असू शकतात, या शक्‍यतेने त्यांचे गाडी नंबर आणि चासी नंबर आरटीओकडे पाठवून देण्यात आले आहेत. त्यातून गाडीमालकाचा शोध घेणे सोयीचे जाणार आहे.

त्यामुळे आता न नेलेल्या किंवा ज्यांचे मालकांची ओळख होत नाही, अशा वाहनांचा न्यायालयाच्या निर्देशानुसार लिलाव करण्यात येईल. मात्र, ही प्रक्रिया होण्याला काही महिने जाणार आहेत. दरम्यान, पावसाळा आला तर नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढते अशावेळी ही वाहने वाहून जाण्याची किंवा खराब होण्याची शक्‍यता जास्त आहे. त्यामुळे ती रिकाम्या जागांमध्ये हलविण्यात येणार आहेत.

वाहने उचलून आणण्यासाठी महापालिकेने पोलिसांना वाहने, क्रेन, जॅमर उपलब्ध करून दिले आहेत. तसेच जो दंड आकारला जातो त्यातील निम्मी रक्कम महापालिकेला द्यावी लागणार आहे. आजपर्यंत चार ते पाच लाख रुपये दंड या वाहनांच्या बदल्यात महापालिकेने घेतला आहे.
– माधव जगताप, विभाग प्रमुख, अतिक्रमण नियंत्रण.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)