पुणे – शालार्थ प्रणालीतील शाळांची माहिती अपडेट करा

बालभारतीचे संचालक व माहिती तंत्रज्ञान गटाचे प्रमुखांची संबंधितांना सूचना

पुणे – शालार्थ प्रणालीत सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देयके तयार करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी शाळांची माहिती भरण्याची कार्यवाही पूर्ण करावी, अशी सूचना बालभारतीचे संचालक व माहिती तंत्रज्ञान गटाचे प्रमुख डॉ. सुनील मगर यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, महापालिका व नगरपालिकांचे प्रशासन अधिकारी व शिक्षण प्रमुख यांना दिल्या आहेत.

शालार्थ प्रणालीत नवीन कर्मचाऱ्यांची नोंदणी करणे, सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची सेवासमाप्तीची नोंद करणे याबाबत 100 टक्के कार्यवाही पूर्ण झाली असल्याची खात्री करावी लागणार आहे. नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त, स्वेच्छा सेवानिवृत्त, मयत आदी कारणामुळे सध्या सवेत नसलेल्या कर्मचाऱ्यांचीच सेवा समाप्ती करण्यात आली आहे. ही कार्यवाही पूर्ण केलेल्या शाळांनी त्यांच्या प्रचलित पद्धतीने फेब्रुवारी 2019 चे वेतन देयक शालार्थ प्रणालीत ऑनलाइन पद्धतीने तयार केले आहे काय याची माहिती घ्यावी. प्रचलित पद्धतीने तयार केलेल्या वेतन देयकातील नोंदी व शालार्थ प्रणालीमध्ये केलेल्या नोंदी तंतोतंत बरोबर असणे आवश्‍यक आहे. तफावत आढळून आल्यास ती तत्काळ निदर्शनास आणून द्यावी.

प्रणालीमध्ये फेब्रुवारीतील सहाव्या वेतन आयोगानुसार तयार केलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या वेतनाची माहिती प्रचलित पद्धतीने तयार केलेल्या वेतन देयकातील माहितीनुसार भरणे अत्यावश्‍यक आहे. याबाबत शाळांमधील कर्मचाऱ्यांची माहिती अपूर्ण आहे. ती तातडीने पूर्ण करावी, असेही मगर यांनी नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)