प्राणीशास्त्र विषयाच्या प्राध्यापकाची राज्यशास्त्र अभ्यास मंडळावर निवड

विद्यापीठाचा अजब कारभार : कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे तक्रार

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या सदस्यपदी अहमदनगर येथील प्राणीशास्त्र विषयाच्या प्राध्यापकाची निवड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात तक्रार कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवीन विद्यापीठ कायद्यानुसार अभ्यास मंडळांवरील सदस्यांच्या नियुक्‍त्या जाहीर केल्या जात आहेत. प्रत्येक विषयांच्या अभ्यास मंडळासाठी प्रत्येकी 6 सदस्यांची निवड जाहीर करण्यात येत आहे. त्याप्रमाणे मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू, अर्थशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, विधी, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान, शिक्षण आदी विषयांच्या सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली.

नगर येथील एका महाविद्यालयामध्ये प्राणीशास्त्र विषयाचे प्राध्यापकांची राज्यशास्त्राच्या अभ्यास मंडळामध्ये निवड झाल्याबाबत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. अभ्यास मंडळाच्या 6 सदस्यांपैकी 3 अध्यापक हे संलग्न महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त परिसंस्थामधील विभागप्रमुख नसलेले निवडणे आवश्‍यक आहे. मात्र तसे होताना दिसत नसल्याचे काही प्राध्यापकांचे म्हणणे आहे.

नवीन यादी लवकरच प्रसिद्ध होणार
विद्यापीठाच्या अभ्यास मंडळांवरील सदस्यांच्या निवडीची यादी अंतिम नाही. त्यामध्ये ज्या त्रुटी आढळून आल्या आहेत, त्यामध्ये सुधारणा करून नवीन यादी लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. विद्यापीठ प्रशासनाकडे आलेल्या तक्रारींची शहानिशा करून त्यानुसार योग्य ते बदल केले जाणार असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)