वाणिज्य अभ्यास मंडळाची नव्याने निवड जाहीर

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या अभ्यास मंडळावरील निवड रद्द करण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासनाने अद्ययावत व नव्याने निवड सदस्यांची यादी जाहीर केली आहे. त्याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार, अभ्यास मंडळांवरील सदस्यांच्या नियुक्‍त्या जाहीर करण्यात येत आहेत. प्रत्येक विषयांच्या अभ्यास मंडळासाठी प्रत्येकी 6 सदस्यांची निवड जाहीर करण्यात येत आहे. अभ्यास मंडळाच्या 6 सदस्यांपैकी 1 विद्यापीठातील पूर्णवेळ अध्यापक, पदव्युत्तर विभागातील 2 अध्यापक, संलग्न महाविद्यालयातील 3 अध्यापक निवडले जात आहे. दरम्यान, विद्यापीठाने वाणिज्य व व्यवस्थापन अभ्यास मंडळाच्या सदस्यांची निवड यादी दि. 31 जुलै रोजी जाहीर केली होती. मात्र, त्यावर आक्षेप आल्याने या अभ्यास मंडळाच्या विषयांच्या निवड सदस्यांची अद्ययावत यादी करण्यात आल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)