विरोधानंतर मराठी विषय बंद करण्याचा निर्णय मागे

दै. प्रभातच्या वृत्तानंतर विषयासाठी प्रवेश : हिंदी विषय घेण्याचे केले होते आवाहन

पुणे – शिक्रापूर येथील कस्तुरी शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांकडून यंदाच्या वर्षापासून मराठी विषय बंद करण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यास कडाडून विरोध झाल्यानंतर मराठी विषय सुरू ठेवण्यात आला. दै. “प्रभात’च्या वृत्तानंतर मराठी विषयासाठी प्रवेश देण्यात आला आणि आता मराठी विषयासाठी प्रवेश फुल्ल झाल्याचे दिसून येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी मराठी विषयाऐवजी हिंदी विषय सक्‍तीचा करण्यात येत असल्याची तक्रार प्राध्यापकांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे केली होती. संस्थेकडून प्रथम वर्षासाठी ऐच्छिक विषय असलेला मराठी न घेता हिंदी विषय घेण्याचे आवाहन करण्यात येत होते. यासंदर्भात विद्यार्थी संघटनांनी वेळावेळी आवाज उठविला. मात्र संस्था आपल्या मतावर ठाम होती.

या सर्व पार्श्‍वभूमीवर दै. “प्रभात’ने कस्तुरी शिक्षण संस्थेचा मराठी विषय बंद करण्याचा घाट असे वृत्त प्रसिद्ध केले होते. विद्यापीठानेही पूर्वपरवानगी न घेता संस्थेला मराठी विषय बंद करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर संस्थेने मराठी विषय विद्यार्थ्यांना पर्याय उपलब्ध करून दिला. हिंदीची सक्‍ती करणाऱ्या महाविद्यालयात 120 विद्यार्थ्यांनी मराठी हा विषय निवडला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकाच विद्यार्थ्याने हिंदी हा विषय निवडला आहे. येथील परिस्थिती पाहून हिंदी शिक्षकानेही घरचा रस्ता धरला आहे.

विद्यापीठाची मान्यता नसल्याचे माहिती अधिकारातून उघड
कस्तुरी शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. निकी मल्होत्रा यांच्या प्राचार्या पदाच्या नेमणुकीस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता नसल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. प्राचार्या मल्होत्रा यांनी मराठी विषय बंद करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यांचीच सप्टेंबर 2017 ते 5 जुलै 2018 या कालावधीत प्राचार्य पदाची मान्यता देण्यात आलेली नाही, असे विद्यापीठाच्या माहिती अधिकार कार्यालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्राचार्य पदाची मान्यता नसतानाही प्राचार्यापद म्हणून कार्यरत असलेल्या मल्होत्रा यांची पाठराखण कोण करीत आहे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)