विद्यापीठात औषधी वनस्पतींचे उद्यान विकसित

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पाच एकर क्षेत्रावर औषधी वनस्पतींचे उद्यान विकसित करण्यात येत आहे. महाराष्ट्रात आढळणाऱ्या एकूण सातशे औषधी वनस्पतींपैकी दोनशेहून अधिक प्रजातींची लागवड या उद्यानात करण्यात आली आहे. उद्यानातील झाडांची एकूण संख्या एक हजाराहून अधिक आहे, अशी माहिती पुणे विद्यापीठाकडून देण्यात आली.

केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून या उद्यानासाठी 13 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात पांढरा धूप, नागकेशर, सर्पगंधा, साल, काळाकुडा, सप्तरंगी, ब्राह्मी, उंडी अशा अनेक दुर्मिळ प्रजातींचा समावेश आहे. आयुर्वेदासहित इतर विविध उपचार पद्धतींत वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींची लागवडही याठिकाणी आहे. आदिवासी औषधी प्रकारांत वापरल्या जाणाऱ्या प्रजातींचाही समावेश आहे. याद्वारे संवर्धनासहित वनौषधींसंदर्भातील पुढील संशोधन करता येणेही शक्‍य होणार असल्याचे या प्रकल्पाचे प्रमुख संशोधक व वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉ. दिगंबर मोकाट यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“महामना वैद्य शंकर दाजीशास्त्री पदे औषधी वनस्पती उद्यान’ असे या उद्यानाचे नामकरण केले जाणार आहे. प्रख्यात वैद्य खडीवाले यांनी विद्यापीठामध्ये अशा स्वरुपाचे उद्यान तयार करण्यासाठी दोन दशकांपूर्वी निधी दिला होता. यानंतर 2013 मध्ये उद्यानासाठी जागा आरक्षित करण्यात आली. दरम्यान, ही वनसंपदा हा आपला बहुमूल्य ठेवा आहे. त्याचे जतन होणे अत्यावश्‍यक आहे. यासाठी आपल्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसहितच नागरिक व एकंदर समाजामध्येच याविषयीची जागृती घडवून आणणे हा या उद्यान उभारणीमागील एक प्रमुख उद्देश आहे. यासाठी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे उद्यान विकसित करण्यात येत आहे, असे मोकाट यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)