#व्हिडीअो : शिवनेरीवरील माती म्हणजे तमाम हिंदूंच्या भावना : उद्धव ठाकरे

रामजन्मभूमी उभारणीसाठी किल्ले शिवनेरीची माती अयोध्येला

पुणे – ‘शिवनेरीवरील माती म्हणजे तमाम हिंदूंच्या भावना’ मी रामजन्मभूमी उभारणी करिता ही माती घेऊन जात आहे, असे उद्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी किल्ले शिवनेरीवर काढले. येत्या २४ तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आयोध्येला रामजन्मभूमीच्या उभारणीस सुरुवात व्हावी याकरिता जाणार आहेत. येथे जाताना रामजन्मभूमी उभारणीसाठी किल्ले शिवनेरीची माती भरलेला कलश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येला नेणार आहेत.

उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, ‘तमाम हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या भूमीची माती नक्कीच राम मंदिर उभारण्यासाठीची पवित्र माती असेल. यामध्ये तमाम रामभक्तांच्या व हिंदूंच्या भावना आहेत. रामजन्मभुमीत राममंदिर पुर्ण होईल’, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

‘ताकाला जाऊन भांडे लपवणार नाही. रामजन्मभुमीचा मुद्दा निवडणुका समोर ठेवुन घेतला’ असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. रामजन्मभुमीचा मुद्दा घेताना पहिले स्व.बाळासाहेबांचे स्मारक पुर्ण करा अशा विरोधकांनी केलेल्या टिकेविषयी बोलताना ‘विरोधकांना मी किंमत देत नाही’ असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवनेरीवर रुद्राक्ष वृक्षाचे वृक्षारोपण केले. यावेळी त्यांच्या समवेत शिरूर लोकसभेचे खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील जुन्नर चे आमदार शरद दादा सोनवणे,राम गावडे,जुन्नर तालुकाप्रमुख माउली खंडागळे जि.प.गटनेत्या आशाताई बुचके, शिवसेना जिल्हा  समन्वयक संभाजी तांबे,युवासेनेचे जिल्हाप्रमुख गणेश कवडे,जुन्नर बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे,नारायणगावचे सरपंच योगेश बाबू पाटे,जुन्नर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष शाम पांडे आणि शिवसैनिक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
7 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)