पुणे वाहतूक पोलिसांची अजब ‘कारवाई’! चारचाकी वाहनास आकारला हेल्मेट न वापरण्यासाठी दंड

पुणे : पुणे शहरामध्ये आज वाहतूक पोलिसांनी चक्क एका चारचाकी वाहन चालकास ‘हेल्मेट’ न वापरल्याबद्दल ‘चलन’ पाठवले आहे. पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे आता चारचाकी वाहनचालकांनी देखील हेल्मेट घालून वाहन चालवायचे की काय? असा प्रश्न पोलीस प्रशासनाला विचारला जाऊ शकतो.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, महेंद्र पाटे नामक पुण्यातील एका गृहस्थांना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पुणे वाहतूक विभागाकडून गाडी क्रमांक एमएच १२ एफएफ ३०२६ या क्रमांकाच्या त्यांच्या वाहनाने आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास वाहतुकीचे नियम मोडले असल्याने ५०० रुपयांचा दंड आकारला जात असल्याचा संदेश त्यांच्या मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आज सकाळी आपण प्रवासच केला नसल्याने पाटे यांनी वाहतूक विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन चलन डाउनलोड केले असता त्यांना धक्काच बसला कारण पोलिसांमार्फत फाडण्यात आलेल्या पावतीवर त्यांच्या एमएच १२ एफएफ ३०२६ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनास ‘हेल्मेट न वापरल्याने’ दंड आकारण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली होती.

पाटे यांनी चालनावरील पुराव्याखातर देण्यात आलेली छायाचित्रे डाउनलोड केली असता काळ्या रंगाच्या हिरो प्लेझर गाडीचे छायाचित्र दिसले. छायाचित्रात दिसणाऱ्या गाडीची नंबर प्लेट पुसट असल्याने पुणे वाहतूक पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता चक्क चारचाकी वाहनाच्या नावे चलन फाडले असल्याचे सिद्ध होत आहे.

पाटे यांच्यासोबत घडलेल्या या प्रकारावरून पुणे वाहतूक पोलिसांच्या ढिसाळ कारभाराची प्रचिती पुन्हा एकदा पुणेकरांना आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)