पुणे – स्थायी समितीच्या आठ सदस्यांची आज निवड

पुणे – महापालिकेच्या स्थायी समितीत वर्णी लागण्यासाठी सत्ताधारी भाजपमध्ये चढाओढ सुरू असून, या निवडीला काही तासच शिल्लक असल्याने इच्छुकांनी संपूर्ण ताकदीने मोर्चेबांधणी केली आहे.

समितीच्या आठ सदस्यांची मुदत 28 फेब्रुवारीला संपुष्टात येत असून, त्यात भाजपच्या सहा तर राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांचा समावेश आहे. त्यासाठी इच्छुकांनी नेत्यांकडे जोरदार “फिल्डींग’ लावली आहे. गुरुवारी होणाऱ्या मुख्यसभेत या आठ जणांची निवड केली जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडे स्थायी समितीची सूत्रे आहेत. 16 सदस्यांच्या समितीमध्ये भाजपचे 10, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 4, तर शिवसेना आणि कॉंग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य आहे. त्यातील 8 सदस्यांचा दोन वर्षांचा कार्यकाल येत्या 28 फेब्रुवारीला संपणार आहे.

यामध्ये भाजपचे सहा सदस्य असून त्यात सुनील कांबळे, मंजुषा नागपूरे, निलिमा खाडे, कविता वैरागे, राजा बराटे आणि आबा तुपे यांचा समावेश आहे. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये विद्यमान गटनेते दिलीप बराटे आणि आनंद अलकुंटे यांचा समावेश आहे.

पक्षीय बलाबल प्रमाणे सर्वाधिक सदस्य भाजपचे असल्याने कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांमध्येही त्यांचीच संख्या जास्त आहे. स्थायी समिती आपल्याला मिळावी यासाठी अनेकांनी पाण्यात देव ठेवले आहेत. काहींनी अगदी राज्यापासून मोर्चेबांधणी केली आहे. तर भाजपच्या चिन्हावर लढलेल्या रिपाइंकडूनही एका सदस्यपदाची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप काय निर्णय घेते, यावर समितीची गणिते असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)