पुणे टू न्यूयॉर्क व्हाया जपान

असं म्हटल जात की, “सोचते रहने से मंजिले नहीं मिलती चलते जाओ रास्ते खुद बा खुद मिल जाएंगे”. आपल्या लाईफमध्ये आपल्याला अशी अनेक लोकं भेटतात ज्यांना आयुष्यामध्ये खूप काही अचिव्ह करायचं असतं मात्र ते करण्यासाठी आवश्‍यक असणारे कष्ट घ्यायची मात्र त्यांची तयारी नसते. इंटरनेटच्या युगातील आजची जनरेशन ही “ऐमलेस’ झाली असल्याचे आपण सातत्याने ऐकत असतो मात्र आजच्या युगातही आपलं ध्येय गाठण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्न करणाऱ्या काही मोजक्‍या तरुणांच्या कथा वाचल्या की वेगळंच मोटिव्हेशन मिळत. आजची कहाणी आहे अशाच एका तरुणाची ज्यानं “पुणे टू न्यूयॉर्क व्हाया जपान’ असा अशक्‍यप्राय प्रवास आपल्या जिद्दीच्या जोरावर पूर्ण करून दाखवला आहे.

ही कहाणी आहे पुण्यामध्ये पदवीचे शिक्षण घेतलेल्या मिल्स लोबो नामक एका सामान्य विद्यार्थ्याची. मिल्सने अगदी सुरुवातीपासूनच आपल्याला आयुष्यामध्ये दोन गोष्टी करण्याचे मनाशी पक्के केले होते. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे मिल्सला जपानमधून मार्शल आर्टस्‌ चा प्रकार असलेल्या “लाई-डो’ तलवारबाजीचे प्रशिक्षण घ्यायचे होते तर दुसरं म्हणजे त्याला अभिनेता म्हणून नावारूपास येण्यासाठी अभिनयाचे धडे गिरवायचे होते.

आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे याबाबतचं व्हिजन पहिल्यापासूनच क्‍लिअर असल्याने मिल्सने आज उराशी बाळगलेली दोन्ही स्वप्न पूर्ण केली आहेत. सध्या न्यूयॉर्कमध्ये वास्तव्यास असलेला मिल्स अमेरिकन फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपले पाय रोवण्यासाठी सज्ज झाला असून 2019 हे वर्ष त्याच्यासाठी स्पेशल ठरणार आहे. मिल्स सध्या अमेरिकन फिल्म इंडस्ट्रीतील नावाजलेल्या दिग्दर्शकांच्या 5 प्रोजेक्‍ट्‌समध्ये काम करत असून यापैकी दोन फिचर फिल्म आहेत. मिल्सने पुण्यातील फ्लेम विद्यापीठातून अभिनयाचे धडे गिरवले असून तो मूळचा गोव्याचा आहे. आपल्या अवतीभोवतीचे अनेक तरुण इंग्रजी भाषेबाबत न्यूनगंड बाळगताना दिसतात मात्र मिल्सने आपलं अभिनयाचं शिक्षण हिंदीतून घेतलं असलं तरी देखील तो हॉलिवूड सिनेमांमध्ये कम्फर्टेबल फील करतो. हॉलिवूडमध्ये नाव कमावण्याची जिद्द उराशी बाळगून सुरु केलेल्या प्रवासाला मिल्सने आपल्या अथक प्रयत्नाच्या जोरावर साध्य केलं असून मिल्सचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

– प्रीती फुलबांधे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)