पुणे – धंगेकरसह तीन फॉर्च्यूनर गाड्या एकाच रात्री चोरीला

मागील काही महिन्यात नगरसेवकाची गाडी चोरीला जाण्याची शहरातील तिसरी वेळ

पुणे – पुण्यातून महागड्या गाड्यांच्या चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्या कारसह तीन जणांच्या फॉर्च्यूनर गाड्या एकाच रात्री लंपास करण्यात आला आहेत. चोरट्यांनी धंगेकर यांची गाडी अवघ्या 17 मिनिटांत लंपास केली. यापूर्वीही शहरातील दोन नगरसेकांच्या महागड्या गाड्या लांबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे चोरट्यांकडून गाड्या चोरीसाठी नगरसेवकांना “टार्गेट’ करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

दि.30 एप्रिल रोजी या घटना घडल्या. पहिल्या घटनेत राज्यवर्धन शितोळे यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शितोळे यांनी कसबा पेठेत त्यांची फॉर्च्यूनर पार्क केली होती. त्यावेळी मध्यरात्री चोरट्यांनी ती पळविली. त्यासोबतच कॉंग्रेसचे नगरसेवक रविंद्र धंगेकर यांचीही फॉर्च्यूनर त्यांच्या तोफखाना इथल्या घराजवळ पार्क केली होती. तीदेखील चोरीला गेली. तर त्याच रात्री कोथरूडमधूनही फॉर्च्यूनर चोरीला गेली आहे. कसबा आणि शिवाजीनगर परिसरातून फॉर्च्यूनर पळविणारे चोरटे एकच आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी नगरसेवक दीपक पोटे यांच्या घरासमोर पार्क केलेली फॉर्चूनर चोरट्यांनी पळवली होती.

याशिवाय अन्य एका नगरसेवकाची गाडीही चोरीला गेली होती. तिचा अजून शोध लागला नाही. एका महिला नगरसेवकाचीही गाडी चोरीला गेला आहे. त्यानंतर आता एकाच रात्रीत 3 फॉर्च्यूनर चोरीला गेल्याने शहरात मात्र खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)