पुणे – महाविद्यालयांत पदवी वितरण सोहळ्यात ‘ड्रेसकोड’ नाही

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यंदाच्या पदवीप्रदान सोहळ्याचा ड्रेसकोड बदलला होता. त्यावरून विविध मतमतांतरे समोर आली. मात्र पदवी वितरण समारंभासाठी महाविद्यलयांना कोणताही ड्रेसकोडचा नियम नाही. अर्थात महाविद्यालयांना पदवी वितरण सोहळ्यात कोणताही “ड्रेसकोड’ नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

विद्यापीठाचा जानेवारीत झालेला पदवीप्रदान सोहळा नव्या पोशाखावरून बराच वादंग निर्माण झाले होते. काळ्या गाऊनऐवजी व्हाईट क्रीम कलरचा झब्बा अथवा नेहरू शर्ट, पांढऱ्या रंगाचा पायजमा, उपरणे आणि फक्‍त मान्यवरांसाठी पूर्वीप्रमाणे पगडी असा पोशाख होता. त्यावरून विविध विद्यार्थी संघटनांनी ऐन पदवीप्रदान सोहळ्यात गोंधळ घातला होता. नव्या पोशाखावरून विद्यापीठात पेशवाईचा पोशाख आणण्याचा प्रताप केल्याचा आरोप संघटनांनी केला होता.

नव्या ड्रेसकोडवरून सिनेट सदस्य डॉ. कल्पना आहिरे यांनी प्रश्‍न उपस्थित केला. त्यावरून विद्यापीठाने म्हटले, की “पदवीप्रदान सोहळ्यात वापरला गेलेल्या ड्रेसकोडचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला होता. तसेच महाविद्यालयांत पदवी वितरण समारंभात नवा ड्रेसकोड वापरणे आवश्‍यक नसल्याचे म्हटले आहे. महाविद्यालयांसाठी ड्रेसकोडवरून कोणताही नियम नसल्याचे’ विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

महाविद्यालय विकास समितीकडे दुर्लक्ष
विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांत विद्यापीठ कायदा 2016 अन्वये महाविद्यालय विकास समिती सर्व महाविद्यालयात स्थापन करणे अनिवार्य आहे. यासंदर्भाचा प्रश्‍न सिनेट सदस्य नंदू पवार यांनी उपस्थित केला. आश्‍चर्य म्हणजे फक्‍त 7 महाविद्यालयांत महाविद्यालय विकास समिती स्थापन झाली आहे. ज्या महाविद्यालयांनी ही समिती स्थापन केली नाही, त्यांना समितीबाबत पाठपुरावा करण्यात येत असल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे. विद्यापीठाला तब्बल 700 महाविद्यालय व संस्था संलग्नित असूनही केवळ 7 महाविद्यालयात ही समिती स्थापन होते, याचाच अर्थ समिती स्थापन करण्याकडे महाविद्यालयांचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)