पुणे – नगरपालिका हद्दीतही उंचच उंच इमारती

File pic

पाच मजल्यांपर्यंतची बांधकाम परवानगी आता 8 मजल्यांपर्यंत

पुणे – नगरपालिका व नगरपंचायतींच्या हद्दीमध्ये उंच इमारती उभारणे आता शक्‍य होणार आहे. सध्या पाच मजल्यांपर्यंत बांधकामास असलेली परवानगी आता आठ मजल्यापर्यंत वाढली आहे. आता त्याच प्रमाणे रस्तारूंदीनुसार “टीडीआर’ वापरून बांधकाम करता येणार आहे.

मुंबई, नवी मुंबई आणि लोणावळा वगळून राज्यातील सर्व ग्रामपंचायतीपासून ते महापालिकांपर्यंतच्या स्थानिक नियोजन प्राधिकरणाच्या बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीत राहिलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी “एकत्रित बांधकाम विकास नियंत्रण नियमावली’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमावलीचे प्रारूप राज्य सरकारकडून तयार करण्यात आले असून पुढील 30 दिवसांत त्यावर हरकती-सूचना मागविण्यात आल्या आहेत. या नियमावलीत अनेक महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. नगरपंचायत अथवा नगरपालिकांच्या हद्दीत 15 मीटर उंचीपर्यंतच्या (5 मजले) इमारती उभारण्यास परवानगी देण्यात येते. “एकत्रित बांधकाम विकास नियमंत्रण नियमावलीत’ महापालिका आणि “पीएमआरडीए’बरोबरच नगरपंचायत व नगरपालिकांच्या हद्दीत 24 मीटर उंचीपर्यंत उंचीपर्यंतच्या इमारतींचे बांधकाम करणे शक्‍य होणार आहे. या तरतुदीमुळे नगरपालिकांच्या हद्दीतही उंच इमारती बांधता येणार आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी “एकत्रित बांधकाम विकास नियंत्रण नियमावली’ नगर विकास विभागाकडून तयार करण्यात आली. मात्र या अध्यादेशासोबत नगर विकास खात्याकडून नियमावलीचे प्रारूप संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले नव्हते. त्यामुळे नियमावलीतील नेमक्‍या काय तरतुदी आहेत, कशावर हरकती-सूचना दाखल कराव्यात, असा प्रश्‍न उभा राहिला आहे. त्यामुळे ही नियमावली प्रसिद्ध करावी, तसेच त्यावरील हरकती-सूचनांची मुदत वाढवावी, अशी मागणी नागरी हक्क समितीचे अध्यक्ष सुधीर कुलकर्णी यांनी केली आहे.

4 टक्‍क्‍यांपर्यंत “टीडीआर’
नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या हद्दीमध्ये “टीडीआर’ वापरण्यास परवानगी देण्याची तरतूद या नियमावलीत करण्यात आली आहे. मध्यंतरी राज्यातील महापालिकांसाठी “टीडीआर’ नियमावलीचे धोरण निश्‍चित करण्यात आले होते. ते धोरण येथेही लागू करण्यात आले आहे. त्यानुसार 9 मीटर आणि त्यापुढील रस्त्यावर 4 टक्‍क्‍यांपर्यंत “टीडीआर’ वापरून बांधकाम करणे शक्‍य होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)