पुणे – संशोधनाचे कामच अनेक वर्षांपासून ठप्प

पुणे – आदिवासी जमातीच्या कला, संस्कृती, जीवनशैली आणि कालानरुप जडणघडणीत होणारे बदल यावर संशोधन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमधील संशोधन करण्याचे कामच गेल्या अनेक वर्षांपासून ठप्प असल्याचे उघडकीस आले आहे.

राज्यातील रायगड, ठाणे तसेच गडचिरोली, जळगाव, पुणे जिल्ह्यातील काही डोंगराळ व दुर्गम भागांत अजूनही अदिवासी जमाती आहेत. या जमातींचा अभ्यास करून त्यांची जीवनशैली त्यात होणारे काळानुरुप बदल याबाबत अभ्यास करण्यासाठी ब्रिटीश कालापासून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था अस्तित्वात आहे. निमसरकारी असणाऱ्या या संस्थेत सुरवातीच्या काळात चांगले संशोधन झाले. त्यातून महाराष्ट्रातील अनेक आदिवासी जमाती उजेडात आल्या. या जमातींमधील लोकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या मुलांना शैक्षणिक सवलती मिळवून देण्यात या संशोधनाचा मोलाचा वाट आहे. राज्यात ठाणे-पालघर भागात अनेक आदिवासी जमातीतील मुलांनी शिक्षणाची कास धरली आहे. त्यामुळे आज ही मुले समाजाच्या मुख्य प्रवाहात आली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कालांतराने या संस्थेचा मुख्य उद्देश जो संशोधनाचा आहे, तोच मागे पडल्यासारखा दिसत आहे.ललित संस्थेचे कुंडलिक केदारी यांनी नुकतीच माहिती अधिकारामध्ये याबाबत माहिती मागविली होती. त्यात ही धक्‍कादायक बाब उघड झाली आहे. त्यांनी आदिवासी जमातीचे आर्थिक व सामाजिक परिस्थितीचे संशोधन झाले काय, आदिवासीचा इतिहास संशोधन पुनर्लेखनचे काम झाले काय, आदिवासींचे ऐतिहासिक दस्तऐवज, ताम्रपट, शिलालेख, शस्त्रे याबाबतचे संशोधन झाले आहे काय, याबाबत माहिती देण्यात यावी अशी मागणी संस्थेकडे केली होती. मात्र, संस्थेने आमच्याकडे माहिती उपलब्ध नसल्याचे उत्तर दिले आहे. म्हणजे, ज्या आदिवासींच्या संशोधनासाठी संस्था स्थापन झाली आहे, त्यातच खंड पडला आहे.

संस्थेचे मुख्य कामच ठप्प..
ही अत्यंत खेदजनक बाब आहे. मी ज्या संशोधनाबाबत माहिती मागविली होती, ते अत्यंत आवश्‍यक होते. पण, हेच संशोधन या संस्थेकडे उपलब्ध नाही. त्याचबराबेर भविष्यात सुद्धा ते सुरू करण्याचा मनोद्‌य नसल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. आदिवासी संशोधन संस्थेला नुकताच स्वायत्त संस्था म्हणून दर्जा मिळाला आहे. परंतु, संस्थेचे जे मुख्य काम आहे. तेच ठप्प झाले असल्यामुळे स्वायत्तता देऊन सुद्धा फारसा फरक पडेल, असे वाटत नाही. काळाच्या ओघात ही संस्था नष्ट होईल काय, अशी भीती वाटत असल्याचे कुंडलिक केदारी यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)