पुणे – सर्व्हर डाऊनची समस्या कायम

नागरिकांचे दस्त नोंदणी कार्यालयात हेलपाटे


मागील तीन महिन्यांपासून सहन करावा लागतो त्रास


सर्व्हरचा वेग कमी होणे, डाऊन होण्याची समस्या


दस्त नोंदविण्यासाठी लागतात पाच ते सहा तास

पुणे – नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दस्त नोंदणी प्रणालीमधील सर्व्हरचा वेग कमी होणे अथवा सर्व्हर डाऊन होण्याची समस्या मागील तीन महिन्यांपासून कायम आहे. याचा त्रास दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागत आहे. त्याचबरोबर सर्व्हर डाऊनमुळे नागरिकांना दुय्यम निबंधक कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे.

नोंदणी विभागाने दस्त नोंदणीसाठी “आय सरिता’ ही प्रणाली आहे. या प्रणालीच्या सर्व्हरचा वेग कमी असतो, तर कधी कधी संपूर्ण सर्व्हर डाऊन होते. डिसेंबर-2018 पासून या समस्येमध्ये वाढ झाली आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात विविध प्रकारचे दस्त नोंदविण्यासाठी नागरिक येत असतात. दस्त नोंदणीच्या प्रणालीमध्ये वेग कमी असल्याने दस्त नोंदविले जात नाहीत. तसेच भाडेकराराचा दस्त नोंदविण्यासाठी 15 ते 20 मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र, सर्व्हरच्या तांत्रिक कारणामुळे हा दस्त नोंदविण्यासाठी पाच ते सहा तास लागत आहे. त्यामुळे नागरिकांचा पूर्ण दिवस हा या कामासाठी खर्ची होत आहे. त्याचबरोबर नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्य शासनाचे समस्येकडे दुर्लक्ष
नोंदणी व मुद्रांक विभाग हा महसूल देणारा शासनाचा महत्त्वाचा विभाग आहे. सर्व्हरच्या या समस्येकडून राज्य शासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसून येत आहे. मागील तीन महिन्यांपासून येणारी ही समस्या सोडविण्यात नोंदणी विभागाला अपयश येत आहे. नोंदणी विभागाचा सर्व्हरचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. सध्या असलेल्या सर्व्हरवरील डेटा क्‍लाऊडमध्ये स्थलांतरीत केला जात असल्याचे नोंदणी विभागाकडून सांगण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)