पुणे – शेतकऱ्यांची यादी करण्याचे काम सुरू

शेतकरी सन्मान योजना : थेट खात्यावर होणार पैसे जमा

पुणे – केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. केंद्राच्यावतीने लवकरात लवकर हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी मंगळवारी येथे सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केंद्र शासनाच्या वतीने देशातील दोन हेक्‍टर पेक्षा कमी जमीनधारक असणाऱ्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्याचा पहिला हफ्ता या महिन्यात देण्यात येणार आहे.यापार्श्‍वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती केंद्राच्यावतीने मागविण्यात आली आहे.त्यानुसार ही माहिती घेण्याचे काम राज्य पातळीवर सुरू आहे.

याबाबत कृषी आयुक्‍त सुहास दिवसे म्हणाले, राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालये आणि कृषी कार्यालयांना याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच, जिल्हानिहाय शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येत आहे. ही जिल्हानिहाय यादी एकत्रित करून त्यानंतर एकत्रित करून आपण केंद्राला पाठविण्यात येणार आहे. साधारण 28 फेब्रुवारीच्या आत आम्हाला ही यादी पाठवायची आहे.त्यामुळे सगळे विभाग यादी तयार करण्याच्या कामाला लागले आहेत.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने चार हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही मदत सुद्धा पोहोचल्याने आता हे पैसे वाटपाचे सुद्धा काम सुरू झाले आहे.राज्यातील दुष्काळी 151 तालुक्‍यांमध्ये हे पैसे शेतकऱ्यांना वाटण्यात येणार आहेत. त्यामुळे कृषी खात्याकडे कामाचा ताण वाढला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)