पुणे – पुलवामा सारखा हल्ला सैन्याचे मनोबल तोडून शकत नाही

सैनी यांचा दावा : देशाच्या रक्षणासाठी सैन्य सज्ज

पुणे – “शत्रू अंतर्गत असो की बाहेरून येणारा, युद्ध पारंपरिक असो की आधुनिक पद्धतीचे, हिमालयातील बर्फाळ पर्वतरांगा असोत, मैदाने असो की वाळवंटातील सीमाप्रदेश प्रत्येक प्रकारच्या परिस्थितीत भारतीय सैन्य देशाचे रक्षण करण्यासाठी सज्ज असते. सैन्यदल नेमह्मीच प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असते. पुलवामा सारखा हल्ला सैन्याचे मनोबल तोडून शकत नाही,’ असा दावा लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांनी मंगळवारी केला.

दक्षिण मुख्यालयातर्फे विविध लष्करी मोहिमांमधील उल्लेखनीय कामगिरी आणि सैन्यदलाच्या सेवेप्रित्यर्थ लष्करी अधिकारी आणि संस्था यांना “सेना मेडल’ तसेच “सेवा मेडल’ने सन्मानित करण्यात आले. लेफ्टनंट जनरल सैनी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना सैनी यांनी पुलवामा हल्ल्यानंतरच्या सैन्यदलाचा कार्यक्षमतेबद्दल माहिती दिली.

सैनी म्हणाले, “जम्मू आणि काश्‍मीर येथे यापूर्वीदेखील फिदायीन हल्ले झालेत. मात्र, यापूर्वी वाहनांची ओळखपत्र देण्यात येत असल्याने अशाप्रकारे वाहनांचा वापर करून मोठ्या प्रमाणात नुकसानीची घटना घडलेली नाही. मात्र, 14 फेब्रुवारी रोजी वापरलेल्या वाहनाचा ओळखपत्र नव्हता. ही एक गंभीर बाब आहे. आगामी काळात याप्रकारच्या आणखी समस्यांचा सैन्याला सामना करावा लागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा समस्येबाबत सध्या काम सुरू आहे.’

स्थानिक नागरिकांवर बाहेरील घुसखोरांचा प्रभाव वाढत असल्यामुळेच येथील नागरिक सैन्याच्या, सुरक्षा रक्षकांच्या विरोधात उभे असल्याचे दिसून येते. त्यांना चुकीच्या मार्गाने न जाण्याबाबत नेहमीच आवाहन केले जाते. मात्र, विघातक कार्यांमध्ये स्थानिकांचा सहभाग वाढल्यास लष्कराकडून त्यांच्या विरोधातही मोहीम हाती घेतली जाईल.’

बांधकाम नियमावलीत बदल अशक्‍य
लष्करी हद्दीतील आसपासच्या परिसरात बांधकाम नियमावलींमध्ये संरक्षण विभागाकडून सूट देण्यात यावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. याबाबत लेफ्टनंट जनरल सैनी म्हणाले, “लष्कराचा परिसर हा पूर्वीपासूनच शहरी भागापासून दूर वसविण्यात आला आहे. याठिकाणी असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे हा परिसर आरोग्यदायी बनला आहे. मात्र, वाढत्या शहरीकरणाने या परिसराला वेढले आहे. पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी बांधकाम नियमावलीत बदलाची मागणी होत असली, तरी लष्कराच्या आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने या नियमावलीत बदल करणे शक्‍य नाही.’

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)