देशभरातील 120 पेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार

ओम दळवी मेमोरियल मायक्रो इंडिया करंडक टेनिस स्पर्धा

पुणे : ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित व एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दहाव्या ओम दळवी मेमोरियल मायक्रो इंडिया करंडक अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज (18 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली, हरियाणा, उत्तरप्रदेश, केरळ, हिमाचल प्रदेश, अरूणाचल प्रदेश, तामिळनाडू आणि राजस्थान या ठिकाणांहून 120 हून अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेत एकुण 1लाख 50 हजार रूपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. विजेत्याला 50एआयटीए गुण, उपविजेत्याला 40 गुण मिळणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही स्पर्धा महाराष्ट्र पोलिस (एमटी जिमखाना) टेनिस जिमखाना, परिहार चौक, औंध येथे दि. 27 ऑक्‍टोबर ते 4 नोव्हेंबर 2018 या कालावधीत होणार आहे. ओम दळवी मेमोरियल फाऊंडेशनचे ट्रस्टी उमेश दळवी आणि ओम दळवी मेमोरियल फाऊंडेशनचे चेअरमन विक्रम बोके व उपाध्यक्ष डॉ. जे. जी.पाटील यांनी सांगितले की, ही स्पर्धा गुणवान टेनिसपटू ओम दळवी याच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित करण्यात आली आहे. ओम दळवीचे 2009 मध्ये आकस्मिक निधन झाले होते. स्पर्धेला मायक्रो इंडिया यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.

मायक्रो इंडियाचे संचालक राजेश पवार म्हणाले की, या स्पर्धेला पाठिंबा देऊन आम्हाला खुप आनंद झाला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून गुणवान व उद्योन्मुख खेळाडूंना आपली गुणवत्ता सिध्द करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेसाठी आयटीएफ व्हाईट बॅच रेफ्री संतोष व्यंकटरमन यांची एआयटीए सुपरवायझर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धेचे पात्रता फेरीचे सामने शनिवार व रविवार दि.27 व 28 ऑक्‍टोबर रोजी होणार असून मुख्य फेरीच्या सामन्यांना दि.29 ऑक्‍टोबरपासून प्रारंभ होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)