पुणे – एकाच दिवसात 11 कोटींचा कर वसूल

पुणे – महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडून एकाच दिवसात सुमारे 11 कोटी 50 लाख रुपयांचा मिळकतकर वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, 1 ते 26 मार्च या कालावधीत सुमारे 65 कोटी 95 लाखांची कर वसुली केलेली असून मिळकतकर विभागाचे उत्पन्न 1,138 कोटी झाले आहे. दरम्यान, येत्या 31 मार्च रोजी रविवार असला तरी, महापालिकेची सर्व करभरणा केंद्रे संपूर्ण दिवसभर सुरू राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी कर भरावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडून थकीत कराच्या वसुलीसाठी पाच स्वतंत्र पथके नेमण्यात आली असून प्रत्येक पथकासह संबंधित पेठ निरीक्षक, विभागीय पेठ निरीक्षक यांना वसुलीचे उद्दीष्ट निश्‍चित करून दिले आहे. त्यानुसार, डिसेंबर महिन्यापासूनच प्रशासनाकडून वसुलीसाठी विशेष मोहीम उघडण्यात आली असून शेकडो मिळकतींवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. तर 26 मार्च रोजी एका दिवसात विशेष वसुली पथकाचे शाम तारू आणि गिरीश पत्की यांनी तब्बल 11 कोटी 50 लाखांचा कर वसूल केला आहे. त्यात झेन्सॉर टेक्‍नॉलॉजी कंपनीचा 6 कोटी 18 लाख, गिरीम टिकमदास दुवा यांच्यांकडून 17 लाख 85 हजार, राजेंद्र चोरडीया यांच्याकडून 11 लाख 30 हजार, पंचशील डेव्हलपर्सकडून 9 लाख 64 हजार, सविता गुटाळ यांचा 6 लाख 25 हजार तर झेरो जी अपार्टमेंटचा 5 लाख 54 हजार रुपयांचा कर वसूल करण्यात आल्याची माहिती कर आकारणी आणि संकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिली.

मिळकतींवर पालिकेचा बोजा
ज्या मोठ्या थकबाकीदारांकडून महापालिकेचा मिळकतकर भरण्यास नकार दिला जात आहे. अशा मिळकतधारकांच्या मिळकतींवर पालिकेचा बोजा चढविण्यास सुरू करण्यात आली असल्याचेही कानडे यांनी स्पष्ट केले. अशा सुमारे 10 मिळकतींचा समावेश आहे. याशिवाय, ज्या मिळकतधारकांनी महापालिकेस थकबाकीसाठी धनादेश दिले आहेत. मात्र, ते वटले नाहीत. त्यांच्यावरही फौजदारी कारवाई करण्यात येत असल्याचे कानडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)