पुणे – प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करा

प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे महापालिकेला पत्र

पुणे – केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), “सफर’ अशा विविध संस्थांच्या पाहणीत पुणे शहरातील हवेच्या प्रदूषणात वाढ झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. “पीएम 10′ आणि “पीएम 2.5′ हे शहराच्या हवेतील सर्वांधिक प्रदूषणकारी घटक असून त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्या उद्‌भवण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे तातडीने महापालिकेने हे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे पत्र “एमपीसीबी’ने महापालिकेस नुकतेच दिले आहे.

या पत्रासोबत जानेवारी ते डिसेंबर 2018 या कालावधीतील शहरातील प्रदूषणाच्या स्थितीची आकडेवारी महापालिकेस देण्यात आली असून “पीएम 10′ अथवा 2.5चे नियमानुसार प्रमाण 100 पर क्‍युबिक मीटर असणे आवश्‍यक आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीनुसार फेब्रुवारीत हे प्रमाण 126.92 इतके होते. केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या अहवालातदेखील देशातील सर्वांधिक हवा प्रदूषित शहराच्या यादीत पुण्याचा पहिल्या 10 क्रमांकमध्ये समावेश आहे. एकूणच शहराच्या हवेचे प्रदूषण वाढत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे महापालिकेने याची गांभीर्याने दखल घेऊन वेळीच पावले उचलावीत असे यात नमूद केले आहे. तसेच, हे प्रदूषण वाढण्यामागे शहरातील वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे वापरले जाणारे इंधन तसेच धुलीकण हे जबाबदर असल्याचे नमूद केले आहे.

प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या सूचना
“एमपीसीबी’कडून महापालिकेस हे वाढते वायूप्रदूषण रोखण्यासाठी जवळपास 50 हून अधिक उपाययोजना सूचविण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यात, प्रदूषण करणाऱ्या वाहनांविरोधात स्वतंत्र मोहीम सुरू करावी, नागरिकांमध्ये जनजागृती करावी, शहरातील प्रमुख ठिकाणांचे पार्किंग बंद करून स्वतंत्र पार्किंग क्षेत्र विकसित करावीत, ई-वाहनांना प्रोत्साहन द्यावे अशा अनेक उपाययोजनांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)