‘लायन्स्‌ प्रिमियर’ लीग टी-20 स्पर्धा आजपासून

पुणे – लायन्स्‌ क्‍लब डिस्ट्रीक 323 डी-2 तर्फे “लायन्स्‌ प्रिमियर लीग अजिंक्‍यपद’ टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 12 ते 18 नोव्हेंबर 2018 या कालावधीत होणार असून ही स्पर्धा नेहरू स्टेडियम आणि डेक्कन जिमखाना मैदानावर होणार आहे.

या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना डिस्ट्रीक क्रिकेटचे मुख्य वसंतभाऊ कोकणे आणि भुपेंदरसिंग धुल्लट यांनी सांगितले की, साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्या या स्पर्धेत एकूण 6 निमंत्रित संघ सहभागी होणार आहेत. शिवनेरी लायन्स्‌, नायर इगल्स्‌, ढोमसे टायगर्स, राठोड रॉयल्स्‌, कलाटे वॉरीयर्स आणि नाईक पलटण या संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे.

-Ads-

स्पर्धेचे उद्घाटन 12 नोव्हेंबर रोजी डिस्ट्रीक गव्हर्नर 3234 डी-2चे रमेश शहा यांच्या हस्ते होणार असून डेक्कन जिमखाना मैदानावर उद्घाटनाचा सामना रंगणार आहे. यावेळी ओमप्रकाश पेठे, अभय शास्त्री, माजी रणजीपटू कैलाश गट्टानी व माजी रणजीपटू चंद्रशेखर जोशी आदि मान्यवर उपस्थित राहणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 18 नोव्हेंबर रोजी नेहरू स्टेडियमवर होणार आहे.

विजेत्या संघाला करंडक तर, उपविजेत्या संघाला करंडक मिळणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)