क्‍लब ऑफ महाराष्ट्रची विजयी आगेकूच

स्टार्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा 2018

पुणे  – येथे सुरु असलेल्या स्टार्स ट्रॉफी क्रिकेट टुर्नामेंटच्या साखळी सामन्यात क्‍लब ऑफ महाराष्ट्रच्या संघाने स्टार्सच्या संघाचा तीन गडी राखुन पराभव करताना मालिकेत विजयी आगेकूच नोंदवली. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना स्टार्सच्या संघाने 44.1 षटकांत सर्वबाद 181 धावांपर्यंत मजल मारताना क्‍लब ऑफ महाराष्ट्रच्या संघासमोर विजयासाठी 182 धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात फलंदाजी करताना क्‍लब ऑफ महाराष्ट्रने 42.2 षटकांत सात गडी गमावताना 182 धावांपर्यंत मजल मारत मालिकेत विजयी आगेकूच नोंदवली.

यावेळी 182 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या क्‍लब ऑफ महाराष्ट्रच्या संघाच्या सलामीवीर राजवर्धन उंद्रे आणि सुरज परदेशी यांनी संघाला दमदार सलामी देताना विजयाचा पाया रचला. यावेळी राजवर्धनने 44 चेंडूत 32 धावांची खेळी साकारली. तर, सुरज परदेशीने 54 चेंडूत 48 धावा करत त्याला महत्वपूर्ण साथ दिली.

दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर आलेल्या सर्वेश सावंत लवकर परतल्यानंतर महाराष्ट्रच्या संघाला लागोपाठ तिन धक्‍के बसले. यानंतर आलेल्या कन्हैया लोढा आणि विराज दारवटकरने सावध फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. यावेळी कन्हैयाने 33 चेंडूत 29 धावांची खेळी केली.

तर, विराजने 18 धावांची खेळी करत त्याला सुरेख साथ दिली. यानंतर सागर आनंदपुरेने 13 धावा करत संघाच्या विजयावर शिक्‍का मोर्तब केला. यावेळी स्टार्सकडून सुरज जाधव आणि अजिंक्‍य गायकवाडयांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. तर, नचिकेत वेर्लेकरने 1 गडी बाद करत त्यांना सुरेख साथ दिली.

तत्पूर्वी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या स्टार्सच्या संघाची सुरुवात खराब झाली. त्यांचा सलामीवीर प्रतिक पवार एकही धाव नकरता माघारी परतला. तर, त्यांच्या मधल्या फळीतील खेळाडूंनाही जास्त चमक दाखवता आली नाही. यावेळी दुसरा सलामीवीर अजिंक्‍य गायकवाडने 60 चेंडूत 37 धावा करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तर, सोहम लेलेने अखेरच्या सटकांमध्ये फटकेबाजी करताना 57 धावा करत स्टार्सच्या संघाला 181 धावांची मजल मारुन दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)