पुणे – बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परिक्षेच्या निकालाबाबत अनेक मेसेज सोशल माध्यमावरून फिरत होते. त्यानंतर निकाल आज लागणार उद्या येणार अशी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली . त्यामुळे अनेकजण बुचकाळ्यात पडले होते. मात्र, आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल 8 जूनला लागणार असल्याचे जाहीर केल्यामुळे सर्व चर्चेला पूर्णविराम मिळला आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (8 जून ) दुपारी एक वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली.
राज्य मंडळाने अधिकृतरित्या जाहीर केल्याप्रमाणे दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.
दहावीचा निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे :
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com