डायमंड्‌स संघाला विजेतेपद

आयकॉन-अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धा

पुणे -डायमंड्‌स संघाने गोल्डन बॉईज संघाचा 16-15 असा संघर्षपूर्ण पराभव करताना येथे झालेल्या पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटने तर्फे आयोजित आयकॉन- अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत डायमंड्‌स संघाने गोल्डन बॉईजचा 16-15 असा पराभव केला. सामन्यात 80 अधिक गटात गोल्डन बॉईजच्या मुकुंद जोशी व आशिष पुंगलिया यांनी डायमंड्‌सच्या मिहीर दिवेकर व योगेश पंतसचिव यांचा 6-5(4) असा तर खुल्या गटात गोल्डन बॉईजच्या चिराग रूणवाल व अमित सुमंत यांनी डायमंड्‌सच्या कौस्तुभ शहा व सारंग देवी यांचा टायब्रेकमध्ये 6-5(4) असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर डायमंड्‌सच्या सारंग पाबळकरने अमित लाटेच्या साथीत गोल्डन बॉईजच्या आदित्य खटोड व विक्रम उंबरणी या जोडीचा 6-3 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण आशा साने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, पीवायसी व्यवस्थापन समितीचे सदस्य अतुल केतकर, प्रशांत सुतार, अभिषेक ताम्हाणे, कौस्तुभ शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)