अर्बन बॅटल टी15 क्रिकेट स्पर्धा : ठाणे थंडर्स, पिंपरी रॉयल्स संघांची विजयी सलामी

पुणे – ठाणे थंडर्स, पिंपरी रॉयल्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना येथे सुरु असलेल्या आयएफसीआर रोटरी डिस्ट्रीक्‍ट 3131 तर्फे आयोजित आयएफसीआर आरपीएल अरबन बॅटल टी 15 स्पर्धेत विजयी सलामी देत उद्घाटनाचा दिवस गाजवला.

पुना क्‍लब, नेहरू स्टेडीयम येथील क्रिकेट मैदानावर झालेल्या स्पर्धेत साखळी फेरीत सथीयराज गुरुस्वामी (29 धावा व 2-18) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ठाणे थंडर्स संघाने हरयाणा आरआयडी 3080 संघावर 71 धावांनी विजय मिळवला. तर, दुसऱ्या सामन्यात दिलीप मॅथ्यूच्या (नाबाद 21धावा व 3-11) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पिंपरी रॉयल्स संघाने मुंबई मास्टर्सवर केवळ 1धावेने विजय मिळवला.

-Ads-

सविस्तर निकाल:

साखळी फेरी: ठाणे थंडर्स : 15 षटकांत 5 बाद 156 (शकील शेख 31, मलंग अरज 31, सथीयराज गुरुस्वामी 29, किरण देवगावकर नाबाद 23, माणिक लुथरा 1-26, रोहित गोयल 1-18) वि.वि.हरयाणा आरआयडी 3080: 15 षटकांत सर्वबाद 85 (गुरदीप सिंग 31, पुनीत वशिष्ठ 20, निलेश वझिरानी 3-13, दिलीप भगत 2-22, सथीयराज गुरुस्वामी 2-18, अभय कुलकर्णी 2-1).

पिंपरी रॉयल्स : 15 षटकांत 9 बाद 118 (शिरीष भोपे 30, वसंत कोकणे 35, दिलीप मॅथ्यू नाबाद 21, रवी संवाल्का 1-2) वि.वि. मुंबई मास्टर्स: 15 षटकांत सर्वबाद 117 (प्रदीप गोडबोले 30, यशवंत दुडुस्कर 19, जयेन मेहता 19, दिलीप मॅथ्यू 3-11, राजेश तावरे 1-10).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)