ब्लास्टर्सचा सलग दुसरा विजय

पुणे – कोकणे स्टार्स आणि प्राधिकरण ब्लास्टर्स यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून “लायन्स्‌ प्रौढ लीग अजिंक्‍यपद’ टी-20 क्रिकेट स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. व्हिजन क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सुनिल मदन याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर कोकणे स्टार्स संघाने नवले ऑक्‍सीकेअर संघाचा 3 धावांनी पराभव करून सनसनाटी विजय नोंदविला.

कोकणे स्टार्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमावून 148 धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये अनंत देशमुख (36 धावा), वसंत कोकणे (28), सुनिल मदन (32) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. या आव्हानाचा पाठलाग करताना नवले ऑक्‍सीकेअर संघाचा डाव 20 षटकात 145 धावांवर संपुष्टात आला आणि संघाला 3 धांवानी विजयासाठी वंचित रहावे लागले. निलेश नातू (43 धावा) व शेखर दालमिया (32) यांची खेळी संघाचा विजय साकार करू शकली नाही. सुनिल मदन (2-18) व आनंद पाटील (2-20) यांनी चमकदार गोलंदाजी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

दुसऱ्या सामन्यात विजय निंबाळकरच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर प्राधिकरण ब्लास्टर्स संघाने पासलकर रॉयल्स्चा 8 गडी राखून सहज पराभव केला. पासलकर रॉयल्स्‌ संघाने पहिल्यांदा फलंदाजी स्विकारली आणि त्यांचा डाव 13.4 षटकात 87 धावांवर आटोपला. प्राधिकरण ब्लास्टर्सच्या विजय निंबाळकर (3-13), श्रीनिवास सरवदे (2-3) आणि विजय शितोळे (2-12) यांनी अचूक आणि भेदक गोलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघाचा डाव झटपट गुंडाळला. प्राधिकरण ब्लास्टर्स संघाने हे आव्हान 15.2 षटकात व 2 गडी गमावून पूर्ण केले. सौरभ रवालिया याने 40 धावा आणि नितेश गुंदेचा याने 39 धावा करून संघाला विजय सुकर केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)