पुणे – “एचसीएमटीआर’साठी एकच निविदा

फेरनिविदा काढूनही अपेक्षित प्रतिसाद नाही

पुणे – शहरातील बहुचर्चीत “एचसीएमटीआर’ (उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग) प्रकल्पाचे काम करण्यासाठी काढलेल्या जागतिक निविदेला पुन्हा एकदा खो बसला असून, दुसऱ्यांदा निविदा काढूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. दुसऱ्यांदाही दोनच कंपन्यांनी यामध्ये सारस्य दाखवले आहे.

या प्रकल्पासाठी निविदेला दोनवेळा मुदतवाढ आणि फेरनिविदा काढण्यात आल्याने आता आलेल्या दोन कंपन्यांच्या निविदा उघडून पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या पथविभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

पुढील प्रक्रिया पार पाडण्यासाठी किमान तीन ते चार आठवड्यांचा कालावधी जाणार असल्याने या प्रकल्पाचे जून महिन्यात उद्‌घाटन करण्याचा सत्ताधाऱ्यांच्या मनसुब्यांवर पाणी पडले आहे.

पहिल्यावेळी या प्रकल्पासाठी 11 कंपन्यांनी निविदा भरण्यास केवळ उत्सूकता दाखवली होती. निविदा प्रक्रियेत मात्र प्रत्यक्षात एकाच कंपनीने सहभाग घेतल्याचे समोर आले. अपेक्षित स्पर्धा व्हावी यासाठी निविदा भरण्यास दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली. मात्र, दोन्ही वेळा केवळ एकाच कंपनीने निविदा भरली. त्यामुळे फेर निविदा काढण्यात आली. या फेरनिविदेची मुदत शुक्रवारी संपली. त्यात केवळ दोनच कंपन्यांनी निविदा भरल्याचे स्पष्ट झाले. या दोन कंपन्यांच्या निविदा उघडून पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान तीन ते चार आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे जून महिन्यात याचे उद्‌घाटन होणार नाही. मात्र, विधानसभेच्या आचारसंहितेच्या आधी ते करण्याची धडपड सत्ताधाऱ्यांची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)