पुणे – सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एकच डीसी रुल

पुणे – ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका आणि विविध नियोजन प्राधिकरण यांच्यासाठी एकच बांधकाम विकास नियंत्रण नियमावली (डीसी रुल) तयार करण्यात आली आहे. या नियमावलीचे प्रारूप राज्य सरकारकडून तयार करण्यात आले असून पुढील तीस दिवसात त्यावर नागरिकांकडून हरकती-सूचना मागविण्यात आल्या आहेत.

महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना स्वत:च्या हद्दीचा विकास आराखडा तयार करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. तर जिल्ह्यातील हद्दीत नगर रचना विभागाकडून प्रादेशिक आराखडा आणि त्यांची नियमावली तयार करण्यात येते. त्यानुसार बांधकामांना परवानगी देण्यात येते. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमावली वेगवेगळी असल्याने आणि प्रत्येक नियमावलीत काही त्रुटी राहतात. या बांधकाम नियंत्रण नियमावलीतील त्रुटी दूर करण्यासाठी एकत्रित बांधकाम विकास नियंत्रण नियमावली तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी या नियमावलीचे प्रारूप राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यावर पुढील तीस दिवसात नगर रचना विभागाकडे हरकती सूचना दाखल करता येणार आहे. त्याच बरोबरच विशेष नियोजन प्राधिकरण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण यांच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या विशेष नगर वसाहतीसाठी सुद्धा राज्यासाठी एकच नियमावली तयार करण्यात आली आहे. किमान शंभर एकरच्या वरील विशेष प्रकल्पांसाठी ही नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यावर देखील हरकती सूचना मागविण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)