सिंहगड-राजगड-तोरणा आंतरराष्ट्रीय अल्ट्रा मॅरेथॉन रविवारी

संग्रहित छायाचित्र

पुणे – वेस्टर्न घाट रनिंग फाऊंडेशनच्यावतीने सिंहगड-राजगड-तोरणा या किल्ल्‌यांवर अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक 9 डिसेंबर 2018 रोजी ही स्पर्धा होणार आहे. तीन किल्ल्‌यांवर एकाच दिवशी धावण्याची शर्यत महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत आहे. तब्बल 5 देश, भारतातील 15 राज्ये आणि 35 शहरातील स्पर्धक स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

पुण्यात होणारी ही स्पर्धा युटीएमबी म्हणजेच अल्ट्रा-ट्रेल डी-मॉंट-ब्लॉंकच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडली गेली आहे. स्पर्धेत इंग्लंड, मलेशिया, फिलीपाईन्स, कॅमरुन या देशातील स्पर्धक सहभागी होणार आहेत. अशी माहिती संस्थेचे विश्वस्त दिग्विजय जेधे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी संस्थेचे विश्वस्त अनिल पवार, मारुती गोळे, मंदार मते, एव्हरेस्टवीर हर्षद राव, महेश मालुसरे उपस्थित होते. अमर धुमाळ, श्रीपाल ओस्वाल, शाहरील सुलेमान, कुणाल बेदरकर, आदित्य शिंदे, बाळासाहेब सणस, सुजित ताकवणे, स्वप्निल जाधव, ,कैलास जेधे यांनी स्पर्धेचे आयोजन केले आहे.

अनिल पवार म्हणाले, 9 डिसेंबर रोजी पहाटे 6 वाजता, सिंहगड पायथ्यालगत गोळेवाडी चौकापासून स्पर्धा सुरू होईल. स्पर्धेत पुरूष व महिलांसाठी दोन गट आहेत. 11 किलोमीटर स्पर्धा सिंहगड पायथा ते नरवीर तानाजी मालुसरे समाधी आणि पुन्हा पायथ्यापर्यंत अशी होणार आहे. 25 किलोमीटर स्पर्धा सिंहगड ते राजगड अशी होणार आहे. तर 50 किलोमीटर स्पर्धा सिंहगड-राजगड-तोरणा (सिंहगड पायथ्यापासून सुरू होऊन ती गडामार्गे विंझर साखरगाव-गुंजवणे, राजगड किल्ला, संजिवनी माची मार्ग, डोंगररांगेतून बुधला माची, तोरणा किल्ला करून वेल्हेमार्गे पाबे गावात समाप्त होईल.

हर्षद राव म्हणाले, एसआरटी मॅरेथॉनचे हे पहिले वर्ष असून जगभरातील माऊंटन रनर्स साठी ही एक रोमांचक स्पर्धा असणार आहे. शर्यतीची एकत्रीत उंची जवळपास 2400 मिटर (7875 फूट) एवढी होते. स्पर्धकांकडून उच्च स्तरीय सहनशक्ती तसेच पर्वतांवर धावण्याचा अनुभव आवश्‍यक आहे. तीन ऐतिहासिक किल्ल्‌यांच्या जोडलेल्या वाटेत, स्पर्धकांना टेकड्या , गावे, जंगल, दजया-खोजया अशा अनेक गोष्टींचा रोमांचक अनुभव मिळणार आहे.

मारुती गोळे म्हणाले, सिंहगड-राजगड-तोरणा हे तीन किल्ले एकमेकांना पर्वतरांगेतून जोडले गेलेले आहेत. या पर्वत रांगेमधील रस्ते हे शिवकालीन मार्ग आहेत. पूर्वीच्या काळी या भागात शेती, गावे, वस्त्या होत्या तसेच व्यवसाय व युद्ध देखील येथे झाली आहेत.

एसआरटी अल्ट्रा मॅरेथॉन ही जगप्रसिद्ध युटीएमबी 2019 साठी पात्र मॅरेथॉन

एसआरटी अल्ट्रा मॅरेथॉन ही इंटरनॅशनल ट्रेल रनिंग असोसिएशनशी संलग्न आहे. तसेच ही मॅरेथॉन युरोपमध्ये होणाजया युटीएमबी म्हणजेच अल्ट्रा-ट्रेल डी-मॉंट-ब्लॉंक 2019 साठी पात्र मॅरेथॉन आहे. फ्रान्समध्ये होणारी ही मॅरेथॉन जगातील सर्वोत्तम माऊंटन मॅरेथॉन मानली जाते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवश्‍यक 3 गुण एसआरटी अल्ट्रा मॅरेथॉन मधून मिळणार आहे. त्यामुळे पुण्यात होणारी ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडली जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)