पुणे – बुकिंगसाठी दिलेले पैसे परत करा – महारेरा

पुणे – सदनिकांसाठी कर्ज मंजूर न झाल्याने बुकिंगच्यावेळी दिलेले पैसे परत करण्याचे आदेश गोदरेज प्रॉपर्टी लिमिटेड आणि पीअरलिटी रिअल प्रॉपर्टीजला “महारेरा’ने दिले आहे. “महारेरा’चे सदस्य क्रमांक एक डॉ. विजय सतबीर सिंह यांना हा आदेश दिला आहे.

हितीन सूर्यकांत तलाठी यांनी याबाबत “महारेरा’मध्ये तक्रार केली होती. तक्रारदार यांनी बिल्डरच्या प्रकल्पात प्रत्येक 1 लाख रुपये देऊन दोन सदनिका बूक केल्या होत्या. बुकिंगची रक्कम दिल्यानंतर संबंधित फ्लॅटसाठी कर्ज मिळवून द्यायची जबाबदारी बिल्डरने घेतली होती. मात्र, कर्ज मंजूर न झाल्याने बुकिंगची रक्कम परत करण्याची मागणी तक्रारदारांनी केली होती. परंतु, संबंधित रक्कम परत करण्यास बिल्डरने नकार दिल्याने तलाठी यांनी ऍड. सुदीप केंजळकर आणि ऍड. प्रिती जगदाळे यांच्यामार्फत “महारेरा’मध्ये तक्रार केली होती. त्यात 2 लाख रुपये आणि तक्रार अर्ज खर्च आणि मानसिक त्रासापोटी 50 हजार रुपये मिळण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, प्राधिकरणाने तक्रारदारांना बुकिंगचे 2 लाख रुपये परत करण्याचे आदेश बिल्डरला दिला आहे. याविषयी ऍड. सुदीप केंजळकर म्हणाले, “कर्ज मंजुर न झाल्यावर बुकिंगसाठी दिलेले पैसे बिल्डरने परत देणे आवश्‍यक आहे. बिल्डर पैसे परत देत नसल्यास त्याविरोधात महारेरा येथे दाद मागता येते.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)