पुणे – रेडीरेकनर दर वाढणार, की ‘जैसे थे’?

पुणे – नोंदणी विभागाकडून जमीन, दुकाने आणि सदनिकांच्या खरेदी-विक्रीच्या दस्तांच्या किंमतीच्या आधारे रेडी रेकनर (वार्षिक बाजारमूल्य) दर 2019-20 या आर्थिक वर्षासाठी तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. मागील आर्थिक वर्षात शासनाने रेडीरेकनर चे दर न वाढविता “जैसे थे’ ठेवले होते. आता लोकसभेची निवडणुकीची लगबग सुरू आहे. त्यानंतर सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका पाहता शासन रेडी रेकनरचे दर “जैसे थे’च ठेवणार की वाढवणार, याकडे लक्ष लागले आहे.

राज्यात रेडीरेकनरचे दर आर्थिक वर्षापासून म्हणजे 1 एप्रिलपासून लागू होतात. नवे दर लागू होण्यास 14 दिवसांचा कालावधी उरला आहे. मालमत्तांचा खरेदी-विक्रीवर मुद्रांक शुल्क भरावे लागते. त्यामुळे रेडी रेकनरच्यादराबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 1 एप्रिल 2018 पासून झालेल्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची प्राथमिक तपासणी करून त्याआधारे रेडी -रेकनरचे दर तयार करण्यात येतात. वर्षभरता नोंदविण्यात आलेल्या खरेदी-विक्री व्यवहारांची माहिते “एनआयसी’ अर्थात राष्ट्रीय सूचना केंद्राकडून मागविली जाते. इंटरनेट आणि इतर माध्यमातील जाहिरातींमधील बांधकमाचे दर आदी सर्व माहिती संकलित करून खरेदी- विक्री व्यवहारातील मालमत्तेचे स्थान, प्रकार, व्यवहारातील प्रत्यक्ष दर आणि रेडीरेकनर पुस्तकातील दर, विकास क्षमता, विकास कल यासर्व बाबी विचारात घेऊन हे दर निश्‍चित केले जातात. त्याचबरोबर महसूल विभागाकडूनही सूचना मागविल्या जातात. या सर्व बाबींचा विचार करून रेडी रेकनरचे दर अंतिम केले जातात.

जिल्ह्यात 1.74 टक्के वाढ प्रस्तावित
2019-20 या आर्थिक वर्षात पुणे जिल्ह्यात रेडी रेकनरच्या दरात सरासरी 1.74 टक्के वाढ प्रस्तावित केली आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका हद्दीत 0.64 टक्के, पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत 1.85 टक्के, ग्रामीण भागात 3.20 टक्के , शहरालगतच्या गावांमध्ये 1.08 टक्के आणि नगरपालिका हद्दीत 1.91 टक्के वाढ प्रस्तावित केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)