पुणे – आरोग्य विभागातील पदभरतीच्या मुलाखती रद्द

12 मार्च रोजी होणार होत्या मुलाखती

पुणे – आरोग्य विभागातील 12 मार्च रोजी होणाऱ्या पदभरतीच्या मुलाखती रद्द करण्यात आल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील “इंटीग्रेटेड हेल्थ ऍन्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन’ अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातर्फे अस्थायी स्वरुपातील पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी आणि गुणवत्ता आश्‍वासन कार्यक्रम सहायक ही पदे भरण्यात येणार आहेत.

ही पदे 11 महिन्यांसाठी आणि एकवट मानधनावर भरण्यात येणार होती. याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे 12 मार्च रोजी याच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आल्या आहेत. याची अर्जदारांनी नोंद घ्यावी, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)