आठ हजार नोंदणीकृत फेरीवाल्यांना शुल्क भरण्यासाठी बीले
पुणे – महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील नोंदणीकृत फेरेवाल्यांकडून शुक्लापोटी 3 कोटी 22 लाख 378 कोटी रुपये जमा केले आहेत. विभागाने शहरातील जवळपास 8 हजार नोंदणीकृत फेरीवाल्यांना शुल्क भरण्यासाठी बीले दिली होती. यातील 3 हजार 121 फेरीवाल्यांनी ही रक्कम महापालिकेकडे जमा केली आहे.
महापालिकेने डिसेंबर 2017 पासून आजवरची बीले देण्यात आलेली आहेत. अतिक्रमण विभागाने फेरीवाल्यांची अ, ब, क आणि ड अशा चार गटांमध्ये विभागणी केली आहे. या नोंदणीकृत फेरीवाल्यांसाठी वार्षिक शुल्क आकारण्यात येते. परंतु, अनेकांकडून या शुल्काचा नियमित भरणा होत नाही. त्यामुळे महापालिकेने फेरीवाल्यांना शुल्क भरण्याबाबत बीले देण्यात आली होती. त्यानुसार फेरीवाल्यांना शुल्काचा भरणा केला असून उर्वरीत फेरीवाल्यांकडून करून घेण्यात येणार आहे.
महापालिका परवाना/फेरीवाला प्रमाणपत्रातील अटी-शर्थींचा भंग करणाऱ्या सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना नोटीस देण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिकेने आतापर्यंत 1 हजार 141 व्यावसायिकांना नोटीस दिल्या आहेत. उर्वरित फेरीवाल्यांना नोटीस देण्याची कारवाई सुरू आहे. अटी-शर्तींचा भंग केल्यास पहिल्या वेळेस 1 हजार रुपये दंड तर दुसऱ्या वेळेस 5 हजार दंड आकारण्यात येणार आहे. त्यानंतरही फेरीवाल्यांनी अटी-शर्तींचा भंग केल्यास अंतिमत: परवाना/फेरीवाला प्रमाणपत्र रद्द करण्यात येणार आहे.
… तर परवाना होणार कायमस्वरूपी रद्द
महापालिका परवानाधारक असलेल्या ज्या व्यावसायिकांनी अद्याप सर्वेक्षण/बायोमेट्रिक नोंदणी केलेले नाही, त्यांना महापालिकेने अंतिम नोटीस दिली आहे. जे परवानाधारक सर्वेक्षण-नोंदणी करणार नाहीत अशांचा अतिक्रमण विभागाचा व्यवसाय परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण निर्मुलन विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले.